अजूनही कॅम्प म्हटलं, की खान रोडवरचे दाट झाडीतले, अंधारलेल्या वातावरणातील ब्रिटिशकालीन दगडी बांधणीचे मिलिटरी अधिकाऱ्यांचे बंगले, सुनसान रस्ते आणि एम. जी., ईस्ट स्ट्रीटवरची नेटकी दुकानंच आठवतात. ‘कयानी’ आठवतं. जॉर्जचं मटण, डायमंड कॅफेचा बनमस्का आणि मार्झोरिनच्या सँडवीचची चव आठवते.
↧