गर्भवती महिलांमध्ये डायबेटिसचे दोन प्रकार आढळतात. प्रजनन काळातील डायबेटिसचे निदान गर्भारपणात होते व प्रजनन पूर्व किंवा आधीपासून असलेल्या डायबेटिस (टाइप एक आणि दोन ) याचे निदान गर्भ राहण्यापूर्वीच करता येते. गर्भवती महिलांमध्ये डायबेटिस होण्याचे प्रमाण दर वीस महिलांमध्ये एक इतके आहे. साधारणपणे गर्भारपणाच्या १३ व्या आठवड्यापासून २८ व्या आठवड्यापर्यंत हा त्रास असतो आणि त्यानंतर गर्भारपणाबरोबरच संपतो. संप्रेरकांमधील बदल व वजन वाढणे ही निरोगी गर्भारपणाची लक्षणे आहेत. मात्र, काहीवेळा हीच लक्षणे आपल्या शरीरावर नकारात्मक परिणाम करू शकतात. गर्भ राहण्यापूर्वीच डायबेटिस असेल तर त्याला प्रसूतीपूर्व डायबेटिस असेही म्हटले जाते. गर्भवती स्त्रीला जर डायबेटिस असेल किंवा संप्रेरकांमधील बदलांमुळे डायबेटिस झाला तर बाळालाही डायबेटिस होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे हे बाळ काही वैगुण्यांसह जन्माला येण्याची शक्यता असते.
- डॉ. प्रदीप गाडगे, डायबेटोलॅाजिस्ट
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट