रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होणे हे लिव्हर सिरॅासीसच्या पहिल्या टप्प्यातील लक्षण आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण मध्यंतरी एका पेशंटला ताप आला. त्याने रक्ताची तपासणी केली तेव्हा प्लेटलेट्ची संख्या कमी झाल्याचे दिसून आले. सुरुवातीला डॅाक्टरांनी डेंग्यूचे निदान केले. ताप जाऊन अनेक दिवस उलटूनही प्लेटलेट्ची संख्या वाढत नव्हती. त्यांना पुढे काही त्रास झाला नाही, पण त्यांच्या रक्तातील साखर वाढलेली होती. पायालाही वारंवार सूज येत होती. अनेक चाचण्या करूनही नेमक्या आजाराचे निदान होत नव्हते. अखेर एका डायबेटॅालॉजिस्टने रेडीऑलॅाजिस्टकडे पाठवून चाचण्या केल्या. तेव्हा लिव्हरची कार्यक्षमता कमी झाल्याचे निदान झाले. त्यामुळे डायबेटीस पेशंटनी खूप काळजी घेण्याची गरज आहे. कारण अन्य पेशंटच्या तुलनेत डायबेटिस असलेल्या व्यक्तींमध्ये लिव्हर निकामी होण्याचे प्रमाण ७७ टक्के जास्त असते.
देशात आजच्या घडीला सुमारे सहा कोटींहून अधिक लोक डायबेटीसने त्रस्त आहेत. त्यांना हृदयाचा, नसांचा, किडनीचा, डोळ्यांचा आणि लिव्हरचाही आजार जडण्याची भीती असते. त्यामुळे डायबेटिस पेशंटनी फॅटी लिव्हरचे निदान वेळीच करून घेण्याची गरज आहे. जास्त प्रमाणात मद्यपान करणाऱ्या व्यक्तींना फॅटी लिव्हरचा सर्वाधिक धोका असते. पण मद्यपान न करणाऱ्या लोकांमध्ये टाईप टू मधुमेह व कोलेस्ट्रॉलच्या अतिप्रमाणामुळे फॅटी लिव्हरचा धोका निर्माण होऊ शकतो.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट