मासिक पाळीप्रमाणेच रजोनिवृत्ती संदर्भात आपल्याकडे अनेक गैरसमज आढळून येतात. याविषयी पुरेशी जनजागृती नसल्याने रजोनिवृत्तीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांविषयी विस्तृत चर्चा केली जात नाही. ४२ ते ५० या वयोगटात महिलांना रजोनिवृत्तीमधून जावे लागते. या टप्प्यांतील मासिक पाळी थांबण्यास रजोनिवृत्तीचा काळ म्हणतात. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनमुळे रजोनिवृत्तीच्या काळात विविध व्याधी आणि तक्रारी जाणवतात. रजोनिवृत्तीमुळे निर्माण होणार्या सामान्य समस्यांबद्दल जाणून घेऊ या..
रजोनिवृत्तीमुळे पुढील महत्त्वाचे शारीरिक- मानसिक बदल होतात.
-मासिक पाळीत अनियमितता
-स्नायूसह हाडांची दुखणी, सांधेदुखी
-वजन वाढणे, पोटाचा घेर वाढणे
-नैराश्य, मानसिक तक्रारी, चिडचिड, मूडमध्ये बदल, आत्मविश्वासाचा अभाव
- मानसिक स्थितीत अकारण बदल होणे. एका क्षणी आनंदी वाटणे तर दुसऱ्याच क्षणी काहीही सबळ कारण नसताना निराशा दाटून येणे.
- त्वचा कोरडी होऊन अंगाला खाज येणे. त्वचेवर सुरकुत्या दिसणे, त्वचा सैल पडणे.
-बद्धकोष्ठता, अपचन, झोप कमी होणे
- हृदयाचे आजार अधिक होण्याची शक्यता
- शरीरातील इस्ट्रोजनचा स्तर कमी होणे
- रक्त साकळून रक्तवाहिन्यांच्या पोकळीमध्ये गुठळी तयार होणे
- एकटेपणा, भूक मंदावणे, अस्थिरता,
- कामात लक्ष न लागणे
- हॉट फ्लशेस
-नखे/ हाडे ठिसूळ होणे.
-पचनशक्ती मंदावल्यामुळे सतत पोट गच्च झाल्यासारखे वाटते.
-स्मरणशक्ती कमी होते.
ही सगळी लक्षणे प्रत्येक स्त्रीमध्ये दिसतीलच असे नाही. लक्षणांची तीव्रताही कमी- अधिक होऊ शकते. मेनोपॉजनंतर स्त्रीच्या शरीरातील 'फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन' आणि 'ल्युटेनायझिंग हॉर्मोन' या हॉर्मोन्सचे प्रमाण वाढते. तर 'इस्ट्रोजेन' या हॉर्मोनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे काही क्षणातच शरीराचे तापमान वाढते. लगेच थोड्या वेळात हे तापमान कमी होऊन थंड वाटते. यामुळे दरदरून घाम सुटतो. कधी- कधी रात्री झोपमोड होते.
मेनोपॉज नंतरच्या आवश्यक तपासण्या
-सीरम कॅल्शिअम.
-सीरम व्हिटामीन डी- ३
- बोन डेन्सिटी - वयाच्या चाळीसाव्या वर्षांनंतर दर दोन वर्षांनी बोन डेन्सिटी तपासणी करणे
- आवश्यकता मॅमोग्राफीची
स्तनांतील गाठी आणि स्तनांच्या कर्करोगाची शक्यता पडताळण्यासाठी वयाच्या ४५व्या वर्षांनंतर दर दोन वर्षांनी मॅमोग्राफी तपासणी करणे आवश्यक आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट