नी अॅण्ड हीप सर्जन
हल्ली तरुण वयातच महिलांना संधिवाताचा त्रास होऊ लागला आहे. अनियमित खाण्याच्या सवयी, बैठी जीवनशैली हीदेखील हा आजार होण्यामागची कारणे आहेत. या आजाराला कसा प्रतिबंध घालता येईल त्याची माहिती घेऊया...
.....
वातावरणातील प्रदूषण, धूम्रपान, आरोग्यदायी आहाराचा अभाव यामुळे संधिवात जडण्याची शक्यता असते. पण, अॅण्टीऑक्सिडंट तसेच हिरव्या पालेभाज्यांच्या सेवनाने संधिवात टाळता येतो. जेवणात योग्य प्रमाणात प्रोटीन (शरीराच्या वजनाच्या प्रतिकिलो मागे एक ग्रॅम याप्रमाणे) गरजेचे आहे. त्याशिवाय व्हिटॅमीन डी व कॅल्शिअमचीही गरज आहे.
* काय टाळावे?
गुडघ्याला संधिवात असेल तर जॉगिंग व दोरीच्या उड्या यासारखे व्यायाम टाळावेत. सायकल व पोहोण्याचा व्यायाम गुडघ्यांसाठी चांगला आहे. संधिवाताचा त्रास असलेल्यांनी गरजेनुसार व शरीराला झेपेल असाच व्यायाम करावा. स्नायू बळकट करण्यासाठी व्यायामाचा चांगला उपयोग होतो. यामुळे गुडघ्याच्या सांध्यांना स्थरिता येते आणि योग्य चपला वापरल्या तर त्याचा फायदा होतो.
व्यायामाचा फायदा संपूर्ण शरीरासाठी असतो. अनेक लोक व्यायाम म्हणून चालतात. पण, शरीराच्या वरच्या भागाकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. एकाच प्रकारच्या सांध्यांचा अतिवापर केल्याने त्यावर लवकर ताण येतो. म्हणून शरीराच्या सर्व भागांना सारखाच व्यायाम मिळणे गरजेचे आहे. सर्वसामान्यपणे दुर्लक्षित राहणारा व्यायामाचा महत्त्वाचा प्रकार म्हणजे स्ट्रेचिंग. स्ट्रेचिंग नियमीतपणे केल्यास सांध्यांमध्ये संतुलन राहते. जखमी होण्याचा धोका टाळायचा असेल तर व्यायाम सुरू करण्यापूर्वी वॉर्मअप करणे गरजेचे आहे; पण ते करताना सांध्याला दुखापत होणार नाही याची काळजी घ्या.
* सवयी बदला
संधिवात झालेल्या महिलांना जीवनशैलीत सुधारणा केल्यास फायदा होतो. जमिनीवर बसणे, जिने चढणे, भारतीय पद्धतीच्या शौचालयाचा वापर यांचा गुडघ्याचा संधिवात असलेल्यांना त्रास होतो. त्यापेक्षा कमोडचा वापर करावा. औषधांमुळे कार्ट्रिजेसची झालेली हानी भरून निघत नसली तरी दुखणे, सूज येणे कमी होते. वेदना कमी होतात. तसेच सांध्यांची कार्यक्षमता सुधारून त्यांचे रक्षणही करता येते.
कोणतेही औषध कार्ट्रिजेसची पुन्हा निर्मिती करू शकत नाही. काही इंजेक्शनमुळे गुडघ्यांच्या सांध्यांना ल्युब्रिकेशन मिळते आणि वेदना कमी होतात. परिणामी सांध्याची झीज कमी होऊन त्यांचे आयु्ष्य वाढवता येते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट