तंत्रज्ञनाचा अतिवापर प्रजनन क्षमतेस कसा घातक ठरत आहे, याची माहिती आपण घेत आहोत. सेल्युलर किरणोत्सर्गामुळे आरोग्यास खास करून गरोदरपणात कसा धोका होतो, त्याची माहिती घेतली. या लेखात आपण मोबाइलच्या रेडिओ फ्रीक्वेन्सीची माहिती घेऊ.
आजच्या घडीला सर्वथरांतील व्यक्तींच्या हातात मोबाइल दिसतो. हातात, खिशात, शर्टच्या वरच्या खिशात मोबाइल ठेवलेले दिसतात. अचानक महत्त्वाचा फोन येईल म्हणून अनेक जण रात्री झोपतानाही मोबाइल डोक्याच्या जवळ किंवा बिछान्यात ठेवतात. पण त्यातील सेल्युलर किरणोत्सर्ग कोणाच्याही लक्षात येत नाही. बहुतेक मोबाइलमधून ८२५ आणि ९१५ मेगाहटर्झच्यामध्ये (MHz) रेडिओ फ्रीक्वेन्सीची देवाण-घेवाण होत असते. या रेडिओ तरंगांचे उत्सर्जन मोबाइल हँडसेट बेस स्टेशन अशा दोन्ही ठिकाणाहून होते. ज्याप्रमाणे मायक्रोवेव्हमध्ये खाद्यपदार्थ गरम करण्याची क्षमता असते, तशीच रेडिओ फ्रीक्वेन्सीमध्ये मानवी स्नायूंना उष्णता प्राप्त होते. रेडिओ तरंगामुळे निर्माण झालेल्या विद्युत चुंबकीय क्षेत्राद्वारे उत्पन्न होणाऱ्या थर्मल (औष्णकि) प्रभावामुळे शरीराच्या ध्रुवीय परमाणुमध्ये डायइलेक्ट्रिक उष्णता निर्माण होते. त्यामुळे जीवंत पेशी मृतवत होतात. ओहिटो स्टेट युनिर्व्हसिटी कॉलेज ऑफ मेडसििनने केलेल्या एका अध्ययनात, सेलफोन टॉवरच्या १०० मीटरच्या परिसरात राहाणाऱ्या स्त्रियांमध्ये जास्त मानसिक ताण व वंध्यत्वाची शक्यता दुप्पट असते, असे दिसून आले आहे.
गर्भधारणेच्या प्रयत्नात असलेल्या स्त्रियांमध्ये, त्यांच्या लाळेतील प्रोटीनच्या (अल्फाअमाइलेज) पातळीवरून त्यांच्या मानसिक तणावाचे अवलोकन केले जाते. एका अभ्यासानुसार ज्या स्त्रियांच्या लाळेमध्ये या प्रोटीनची पातळी उच्च होती त्यांच्यात ही पातळी कमी असलेल्या स्त्रियांच्या तुलनेत गर्भधारणेची शक्यता २९ टक्के कमी होते. केवळ मोबाइलच नव्हे, तर कॉर्डलेस फोन्समधूनही मोबाइलसारखेच उत्सर्जन होत असते. काही तज्ज्ञांच्या मते हे उत्सर्जन मोबाइल फोनपेक्षाही घातक आहे. या लेखात आपण मोबाइलच्या उत्सर्जनाची माहिती घेतली. लेखाच्या पुढील भागात आपण कॉर्डलेस फोन्समधून होणाऱ्या उत्सर्जनाची माहिती घेऊ.
डॉ. स्नेहा साठे,
आयव्हीएफ फर्टलिटी कन्सल्टंट
↧
सेल्युलर किरणोर्त्सगाचे धोके
↧