देशाची आर्थिक राजधानी म्हणवणाऱ्या मुंबापुरीत पुरुष प्रसाधनांच्या तुलनेत महिलांच्या स्वच्छतागृहांचा टक्का आहे तीन टक्के! ‘राईट टू पी’ चळवळ गेल्या तीन वर्षांपासून हे सारं मांडते आहे. महत्त्वाच्या मूलभूत गरजांबाबत सुरू असलेल्या अन्यायाचं हे वास्तव ‘अक्षरा’ या संस्थेनं तयार केलेल्या लघुपटातून पुन्हा समोर आलं.
↧