....
इन्फ्लूएन्झा हा जगभरात आढळतो. प्रौढांमध्ये याचे प्रमाण सुमारे ५ ते १० टक्के आणि मुलांमध्ये २० ते ३० टक्के आहे. बालकांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात पसरू शकतो. प्रौढांपेक्षा शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये याचे प्रमाण अधिक आढळून येते. चार ते सहा वर्षांच्या विद्यार्थ्यांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात पसरण्याचा धोका असतो. साथीच्या काळात शाळांमध्ये हा अधिक प्रमाणात पसरत असल्याचे आढळून येते. आजारी मुले एकाच वर्गात बसतात. शालेय उपक्रमाच्या निमित्ताने अनेक विद्यार्थी एकत्र येतात. आजारी व्यक्तीच्या संपर्कामुळे तो वेगाने पसरण्याची शक्यता असते.पसरण्याची कारणे
इन्फ्लूएन्झाची लागण झालेली व्यक्ती खोकते, शिंकते किंवा बोलते तेव्हा फ्ल्यूचा विषाणू हवेतून प्रवास करतो. लहान किंवा अतिशय सूक्ष्म कणही श्वसनाव्दारे शरीरात प्रवेश करतात. एखाद्या वस्तूवर पडलेला फ्ल्यूचा विषाणू शरीरात प्रवेश करू शकतो. उदाहरणार्थ टेलीफोन, कम्प्युटरचा की बोर्ड याच्यावर हा विषाणू असेल आणि त्या उपकरणाला हात लावला तर डोळे, नाक किंवा तोंडात्या वाटे शरीरात प्रवेश करू शकतो.
* अधिक धोका मुलांना
हा विषाणू श्वसन व्यवस्थेवर हल्ला करतो. नाक, कान व घशावर हल्ला होतो. लहान मुले व कमी प्रतिकारशक्ती असलेले विद्यार्थी तसेच जे विद्यार्थी स्वतःची काळजी घेत नाहीत, शाळेत किंवा क्लासमध्ये सावधानता बाळगत नाहीत अशांना याची लागण होऊ शकते. त्यासाठी आपल्या अपत्याला सुदृढ व निरोगी ठेवणे हे पालकांचे कर्तव्य आहे.
* लक्षणे
अचानक खूप ताप येतो, स्नायू-अंग दुखणे, हुगहुडी भरणे, थकवा अशी लक्षणे दिसून येतात. फ्ल्यू झाल्यावर शाळेला सुटी घ्यावी लागते. काही वेळा त्यातून न्युमोनियासारख्या गुंतागुंतीच्या केसेसही होतात.
* उपाय
याची लक्षणे आढळल्यावर सर्वप्रथम डॉक्टरांकडे तात्काळ उपाय सुरू करावेत. घरच्या घरी उपाय करू नयेत. फ्लूपासून संरक्षण करण्याचा उत्तम उपाय म्हणजे लस घेणे, बालकाला सहा महिन्यांपासून ही लस घेण्याची शफिारस केली जाते. लसीकरण आता दोन स्वरूपांत घेता येते. नाकाव्दारे आणि इंजेक्शनव्दारे लस देता येते. नाकाव्दारे दिल्या जाणा-या लसीमध्ये संरक्षण क्षमता अधिक असते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट