...
लहान मुलांमध्ये रात्रीच्या वेळेत बिछाना ओला करण्याची सवय पाच वर्षानंतरही सुरुच राहिली तर दुर्लक्ष करून चालत नाही. वैद्यकीय भाषेत सांगायचे तर याचे 'प्रायमरी' व 'सेंकडरी नॉक्टर्नल' असे दोन प्रकार असतात. प्रायमरी नॉक्टर्नल इन्शुरेसीस म्हणजे लहानग्यांना खूप लहानपणापासून बिछाना ओला करण्याची सवय असणे आणि ती सवय पाच वर्षानंतरही सुरू राहाते. सेकंडरी नॉक्टर्नल इन्शुरेसीस म्हणजे किमान सहा महन्यिांच्या कालावधीकरीता बिछाना ओला करण्याची सवय सुटल्यानंतर पुन्हा एकदा बिछाना ओला करणे सुरू करणे.
अनेक कारणे
काही मुलांना मूत्राशयाचा कोणताही त्रास होत नाही. पण मूत्र साठवण्याची क्षमता कमी असते. त्यासाठी लघवी करण्याची निकड भासते. मूत्राशयाचा, मूत्राशयातून बाहेर जाणा-या किंवा मूत्राशयाकडे येणा-या चेतापेशींचा विकास होण्यात विलंब होणे, झोपेत असताना लघवीसाठी गाढ झोपेतून जागे न होता न आल्याने नकळत बिछाना ओला करणे, मूत्राशय अस्वाभाविकपणे आकुंचन पावणे, मूत्राशयात स्नायूंमधील आकुंचनामुळे मूत्राशय पूर्ण भरण्याआधीच रिकामे होणे किंवा रात्रीच्या वेळेस शरीरात अँटी डाययुरेटिक हार्मोन्स कमी जास्त प्रमाणात स्रवणे आणि लघवी होणे असे प्रकार होतात. काहींमध्ये ही सवय अनुवंशिक असल्याचेही दिसून येते.
प्रत्येकाचे उपचार निराळे
प्रत्येक बालकासाठी उपचार वेगळे असू शकतात. त्यासाठी औषधांपेक्षा या समस्येच्या मूळापर्यंत जाण्याची गरज आहे. काहींना दीर्घ तपासण्या करण्याची गरज असते तर काहींना मोचक्याच तपासण्या केल्या तरी चालते. त्यानंतर ही सवय कायमची बंद होऊ शकते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट