![]()
जगण्याचं मर्म उलगडून सांगणारी गालिब यांची शायरी काळाच्या सीमा ओलांडून
अजरामर झाली आहे. गालिबवर आकंठ प्रेम करणारे गुलजार यांच्या कविताही गालिब यांचीच
परंपरा सांगणाऱ्या. या दोघांच्या शायरीमध्ये रंग भरले आहेत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे
प्रसिद्ध पाकिस्तानी चित्रकार शाहीद रस्सम यांनी.