संघटित गुन्हेगारीचे अभ्यासक पत्रकार एस. हुसेन झैदी यांनी ‘माय नेम इज अबू सालेम’ या पुस्तकातून अबू सालेमचा प्रवास टिपला आहे. उत्तर प्रदेशातील आझमगढमधील कोर्टात वकिली करणाऱ्या अब्दुल कय्युम अन्सारी यांना १५ किमीवर असलेल्या त्यांच्या सराय मीर गावात मान होता. त्यांच्या चार मुलांपैकी एक म्हणजे अबू सालेम.
↧