सीमेवर लढणाऱ्या सैन्यापासून तर समाजाला अज्ञानाच्या तिमिरातून ज्ञानाच्या तेजाकडे घेऊन जाणाऱ्या शिक्षक वर्गापर्यंत सर्वच जण पोटावर चालतात. देश चालविणाऱ्या या यंत्रणेच्या पोटाकडे सरकार नावाच्या पालक संस्थेचे दुर्लक्ष झाले तर दर्जाहीनतेचे विकार उद्भवतात. नाशिक जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळाला या विकाराचे निदान होण्याची शक्यता बळावली आहे.
↧