Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 2741 articles
Browse latest View live

कलेला फुटले पंख

$
0
0

विजयराज बोधनकर

एक कला दुसऱ्या कलेशी नातं जोडून असते. नात्याचे मूळ कुठल्याशा अर्थाशी जोडले गेलेले असते. अर्थाच्या सकारात्मक स्वार्थातून अर्थकारण जन्म घेत असते. साहित्याशी चित्रकला जोडली गेली. संगीताशी काव्य, चित्रपटाशी लेखन, अभिनयाशी नेपथ्य अशा अनेक कला एकमेकांशी सहज जोडत स्वार्थ-परमार्थाच्या रुळावरून धावत असतात. त्यातून कला बहरते आणि याच बहरण्याचा जागर समाज रसिकांपर्यंत पोहचवत असतो. आपल्या अहंभावाच्या कोषातून बाहेर येऊन कला सार्वजनिकरित्या समाजापर्यंत पोहचते आणि रसिक मनात प्रवेश करते, तेव्हा तिला पंख फुटतात ते अनंताच्या भरारीचेच.

कलावंत म्हणून मलाही आलेले अनुभव व्यक्त करावेसे वाटतात. २००४ साली कोमसापच्या आणि २०१०मध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनात मी चितारलेल्या साहित्यिकांच्या ९० अर्कचित्रांचे प्रदर्शन ठाण्यात भरविले होते. म्हणजे तिथे साहित्याशी चित्रकला जोडली गेलेली होती. अशा साहित्याच्या वातावरणात साहित्यप्रेमी आपोआपच चित्रकलेशी जोडले जात होते. चित्र आणि साहित्याविषयी भरभरून बोलत होते. मनात दोन्हीचा सुगंध घेऊन जात होते. यालाच मी जागर म्हणतो. चित्रकलेविषयी अनेकांचे अनेक प्रश्न रसिक विचारीत होते. उहापोह चालू झाला होता. यातून तीन गोष्टी प्रकाशात येत होत्या- भूतकालीन साहित्यप्रेम, कलेची साक्षरता आणि कलावंताचं अस्तित्व. अशाच उपक्रमातून सहज जमलेल्या जनसमुदायापुढे प्रत्येक कलावंताला आपआपली कला साकार करण्याची संधी मिळत असते. माझा अर्कचित्राचा उपक्रम निस्वार्थ होता आणि त्याचमुळे आयोजक, रसिक आणि माध्यमांनी त्याला न्याय मिळवून दिला. मला शालेय जीवनापासून लिहिण्याची आणि वाचण्याची कला किंवा सवय लागल्यामुळेच या अर्कचित्रांची निर्मिती होऊ शकली. अन्यथा मी चित्रकलेच्या कोषातच अडकून पडलो असतो आणि मग फक्त प्रश्नचिन्ह उरलं असतं.

हेच प्रदर्शन मग नागपूर, चंद्रपूर, चिपळूण, रत्नागिरी, जळगाव इथे प्रवाहित झालं. कारण त्यामागे मग सामाजिक अर्थाच, जागृतीच कारण जोडलं गेलं होतं. कुठलीही कला समाजापर्यंत निःस्वार्थ भावाने पोहचवावी लागते. मग समाज तिला आपल्या मनात स्थान देतो आणि तेथून खरी कलेविषयी साक्षरता आणि प्रसार सुरू होतो. समाज, रसिक चित्रप्रदर्शन बघायला येत नाहीत, ही नेहमीचीच ओरड असते. याची करणेही आपण शोधली पाहिजेत. त्याची कारणं अगदी सरळ आणि स्वच्छ आहेत. शालेय विद्यार्थ्यांना कुठली शाळा जबाबदारीने चित्रप्रदर्शन पाहायला घेऊन जाते? शाळेत विद्यार्थ्यांसमोर चित्रकार- शिल्पकारांना बोलावून प्रात्यक्षिके द्यायला लावते? चित्रविषयक गप्पाष्टकांचा तास लावला जातो? यातलं काहीच होत नसेल, तर शाळेतून निघणारा विद्यार्थी तरी आर्टगॅलरीत चित्र बघण्यासाठी कशाला जाणार? विहीरीच नाहीत, तर पोहणार कुठून? आजचा विद्यार्थी हा उद्याचा समाज आहे. ओल्या मातीवरच संस्कार करता येतात. ते होतात का? फक्त धन संपत्ती मिळवून देणारे विषयच शाळेत मुलांच्या अवतीभोवती खेळत असतील, तर उद्या मुलंही त्याच विषयाभोवती नाचत राहतील. प्रत्येक शहरातल्या शाळेला रसिक विद्यार्थी निर्माण करण्याचा धर्म आहे, पण तो या व्यावसायिक शिक्षणात हरविला गेला. गाणं नाही, काव्य नाही, श्रवण नाही की साहित्यावरच प्रेम नाही. मग अपेक्षा कोणाकडून करायच्या?

हल्ली शाळाच जर व्यावसायिक शिक्षणातच गुंतल्या असतील, तर मग पालकांनी हा विडा उचलला पाहिजे. मी माझ्या मुलांना रसिकता शिकवीन, त्यांना गॅलरीत नेईन, कविता ऐकवीन, भारतीय संगीत शिकवीन, चांगलं साहित्य वाचून दाखवीन, हे जरी झालं, तरी चित्रप्रदर्शनांना, संगीताच्या कार्यक्रमांना कवीसंमेलनाला ताज्या दमाचा वर्ग उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही.

अगदी कालचीच गोष्ट. चिपळूणजवळच्या गांग्रई गावाजवळ चित्र-शिल्पकलेचा कॅम्प चालू झाला आहे. तीस ते चाळीस चित्रकार, शिल्पकार काम करत आहेत. आजूबाजूच्या गावकऱ्यांसाठी तो खुला आहे. अनेक गावकरी येतात बघून जातात. यालाच चित्र-शिल्प साक्षरता मी मानतो. सवर्डे स्कूल ऑफ आर्टच्या वतीने हा उपक्रम तीन डिसेंबरपर्यंत चालू आहे. गावकऱ्यांना अपरिचित असलेली कला परिचित होऊ लागली आहे. एक दीड महिन्यापूर्वी ठाण्यात जिल्हा परिषदेच्या सहकार्याने असेच कालाशिबीर भरविण्यात आले होते. त्याला समाजाचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रत्यक्ष कलावंत काम करताना रसिक पाहतो आणि त्यातूनच त्याच्या जाणीवा रुंदावतात, हे काय कमी आहे. अशाच सातत्यपूर्ण चळवळीतून माझं शहर आणि गाव कलेच्या बाबतीत समृद्ध झालं पाहिजे. म्हणजे टीव्हीच्या पुढ्यात बसलेला वर्ग मोकळ्या वातावरणात कलेशी जोडला जाऊ शकतो आणि आपलं शहर कलेशी जोडलं जाऊ शकत. योगायोगाने असं वातावरण निर्माण होत आहे. हीच आनंदाची बाब माझ्या ठाणे शहरासाठी लाभदायक आहे. आता ठाण्याला कलेचे पंख फुटू लागलेत, हे निश्चितच.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एचआयव्हीबाबत जागृती हवीच

$
0
0

डॉ. भावेश देशमुख, त्वचा तसेच संसर्गजन्य आजारतज्ज्ञ

हे लक्षात ठेवा..

एड्स स्पर्शाने होत नाही, कुटुंबासह समाजाने एचआयव्हीग्रस्त, एड्ससह जगणाऱ्या व्यक्तीला पाठिंबा दिल्यास त्याचे मनोबल वाढून आजाराशी लढण्याची मानसिक शारीरिक तयारी होण्यास मदत होईल.

संसर्गजन्य व्यक्तींनी कुटुंबनियोजन साधनांचा, निरोधचा वापर करावा.

अधिकृत रक्तपेढ्यांमधूनच रक्त घ्यावे.

कोणत्याही रक्तपेढीत वापरली जाणारी सुई वा इंजेक्शनची सिरींज निर्जंतूक आहे का, याची खात्री करून घ्यावी.

सलून्समध्ये वापरली जाणारी कात्री, ब्लेड निर्जंतूक आहे का, याची खातरजमा करावी.

लक्षणे केव्हा आढळतात

एचआयव्हीचा संसर्ग झाल्यानंतर काही महिने कोणत्याच प्रकारची लक्षणे काही पेशंटमध्ये आढळून येत नाही. अशी अवस्था आठ ते दहा महिने ते काही वर्षांपर्यंत असू शकते.

कालांतराने या पेशंटमधील रोगप्रतिकारशक्ती कमी होत जाते, व नवी लक्षणे दिसू लागतात. यात वजन कमी होण्यासह सतत खोकला येणे, उलट्या होणे, अधूनमधून ताप येण्याच्या तक्रारी आढळतात. न्यूमोनिया, टीबी, नागीण, कावीळ, अन्ननलिकेला बुरशीमुळे येणारी सूज, त्वचेचा कॅन्सर असे अनेक आजार होतात. या आजारात रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे संर्सगाचे प्रमाण वाढते.

उपचारपद्धती

आज एड्सग्रस्त पेशंटसाठी सरकारी आरोग्यकेंद्रावर एआरटी उपचारपद्धती उपलब्ध आहे. या औषधांमुळे आज एड्सग्रस्त व्यक्तींचे आयुर्मान उंचावले असून, सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे ते देखील आयुष्य जगू शकतात. या उपचारपद्धतीत दिल्या जाणाऱ्या गोळ्यांच्या किंमती खासगी हॉस्पिटल्समध्येही तुलनेने कमी झाल्या आहेत. समुपदेशन, उपचार आणि एड्स नियंत्रण कार्यक्रमाच्या तिहेरी योगदानामुळे हा आजारावर नियंत्रण मिळवणे तुलनेने सोपे झाले आहे.

हे अवश्य करा..

एड्सबाधित व्यक्ती, कुटुंब, महिलांना सामाजिक पातळीवर स्वीकार करा.

एचआयव्ही हा केवळ संसर्गित लैंगिक संबधांतूनच होतो या भ्रमात राहू नका.

आपल्या परिघातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, रक्तदानाच्या कार्यामध्ये काम करणारे तज्ज्ञांनाही संसर्गित सुयांपासून स्वतःची काळजी घेण्यास अ‍वश्य सांगा.

प्रतिबंध हाच एचआयव्हीवर मात करण्याचा उत्तम उपाय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रज्ञावंताचा अनोखा सन्मान!

$
0
0

श्रीराम शिधये

दी रॉयल सोसायटी ऑप लंडनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी वेंकटरामन रामकृष्णन यांनी काल, एक डिसेंबरला घेतली. संस्थेच्या आजवरच्या साडेतीन शतकांच्या इतिहासात प्रथमच एक भारतीय वंशाचा, १६ वर्षांपूर्वीच इंग्लंडमध्ये आलेला शास्त्रज्ञ अध्यक्षपदी बसला आहे.

'आज आपण तंत्रज्ञानाधिष्ठित जगात राहत आहोत आणि दिवसेंदिवस तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढतच जात आहे. हे तंत्रज्ञान गुंतागुंतीच्या विज्ञानावर आधारित आहे आणि त्यामुळेच ते तंत्रज्ञानही गुंतागुंतीचंच आहे. म्हणूनच आता लोकांना विज्ञान-तंत्रज्ञानाच्या दृश्यपरिणामांमागचं तत्त्व समजावून सांगणं, कधीही नव्हतं इतकं, आता आवश्यक झालं आहे. जर रुढ संकल्पनांना छेद देणारी काही माहिती असेल तर तीसुद्धा लोकांसमोर आली पाहिजे. मुख्य म्हणजे कोणत्याही प्रश्नाबाबत विचार करण्याची वैज्ञानिकांची जी पद्धत असते, ती विचाराची रीतही लोकांसमोर यायला हवी. वैज्ञानिकांनी लोकांसमोर सारं काही खुलेपंणानं मांडावं आणि मग लोकांनी त्याबाबत विचार करून आपलं मत बनवावं. आज याच गोष्टीची आवश्यकता आहे,' असं सर वेंकटरामन रामकृष्णन यांनी म्हटलं आहे. दी रॉयल सोसायटी ऑप लंडनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी काल, एक डिसेंबरला घेतली. त्यापूर्वी त्यांनी एका मुलाखतीत हे मत व्यत्त केलं आहे आणि तेच त्यांना रॉयल सोसायटी कोणत्या दिशेनं न्यायची आहे ते दर्शविणारं आहे.

दी रॉयल सोसायटी ऑफ लंडनच्या आजवरच्या साडेतीन शतकांच्या इतिहासात प्रथमच एक भारतीय वंशाचा, १६ वर्षांपूर्वीच इंग्लंडमध्ये आलेला शास्त्रज्ञ अध्यक्षपदी बसला आहे. याच वर्षाच्या मार्च महिन्यामध्ये वेंकी रामकृष्णन यांची निवड रॉयल सोसायटीच्या अध्यक्षपदी झाली. थेट १७व्या शतकात ज्या संस्थेची पाळंमुळं आहेत आणि ज्या संस्थेचं अध्यक्षपद सॅम्युएल पेपीस, आयझॅक न्यूटन, अर्नेस्ट रुदरपोर्ड अशांनी भूषविलं आहे, ज्या संस्थेचे आज १६०० फेलो आहेत त्या संस्थेच्या अध्यक्षाच्या खुर्चीवर आता वेंकी रामकृष्णन बसले आहेत. चार्ल्स डार्विन, अल्बर्ट आइन्स्टाईन या संस्थेचे फेलो होते, ही एकच गोष्ट या संस्थेची महत्ता लक्षात येण्यास पुरेशी ठरावी. या संस्थेचे अध्यक्षपद हे आता अधिकच आव्हानात्मक झालं आहे. याला कारणं दोन. एकतर विज्ञान-तंत्रज्ञानात होत असलेली विलक्षण प्रगती, त्या प्रगतीचे दृश्यपरिणाम आणि त्यातील काहांमुळं उठणारी वादळं आणि दुसरं म्हणजे एकंदर जगापुढं आज असणारे विविधांगी प्रश्न. त्यामध्ये हवामानातील बदल, ऊर्जा, पर्यावरण, आरोग्य, अन्नसुरक्षा हे जसे आहेत तसेच वादळी ठरण्याची संभाव्यता असणारे जनुकक्षेत्रातील संशोधनासारखेही विषय आहेत. या परिस्थितीत वैज्ञानिकांनी आता पुढाकार घेऊन लोकजागृती करण्याची गरज भासू लागले आहे, कारण हे विषय आता जागतिक स्वरूपाचे बनत आहेत. त्यामुळंच रॉयल सोसायटीनंसुद्धा आता काही गोष्टी करणं आवश्यक झाल्याचं मत काही नामवंत संशोधकांनी व्यत्त केलं आहे.

प्रा. अथेन डोनाल्ड (एक्सपरिमेंटल पिजिक्स, केम्ब्रिज युनिवहर्सिटी) म्हणतात, विज्ञान हे आता दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहे. त्यामुळंच विज्ञान हा विषय आता प्रयोगशाळेत बंद करून घेऊन काम करणाऱ्या बुद्धिमंतांपुरताच राहिलेला नाही, तर तो अवघ्या समाजाशी आणि त्या समाजाच्या स्वास्थ्याशी निगडित झाला आहे. म्हणूनच विज्ञान हे आता आपल्या सांस्कृतिक संपन्नतेचा अविभाज्य भाग आहे हे मान्य केलं पाहिजेच, पण भविष्यातील समृद्धी विज्ञानातूनच येऊ शकते, याचंही भान ठेवलं पाहिजे.' वेंकी रामकृष्णन यांना आताच्या काळाचं नेमकं भान आहे.

इंग्लंडमधील सध्याच्या शिक्षणपद्धतीत बदल करणं त्यांना आवश्यक वाटतंच पण सरकार विज्ञानासाठी जो निधी देते तो अपुरा असून त्यात वाढ व्हायला हवी, असं ते म्हणतात. स्थलांतरितांबाबतचा दृष्टिकोनही बदलायला हवा, कारण सध्याच्या धोरणामुळं अनेक प्रज्ञावंत विद्यार्थी, विशेषत: भारतीय, इंग्लंडकडे पाठ पिरवतात. कोणाही बुद्धिमंतानं इंग्लंडकडे पाठ फिरवणं इंग्लंडमधील विज्ञानाच्या विकासाला मारक ठरणारं असल्याचंही मत त्यांनी नोंदविलं आहे. युरोपीय समूहात राहाण्याचे अनेक फायदे असल्याचं ते सांगतात आणि त्याबाबतचं सार्वमत कळीचं ठरू शकतं इकडं ते लक्ष वेधतात. आज घटकेस वेंकी रामकृष्णन यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत. त्यांची पूर्ती ते कशी आणि किती करतात, हे येणारा काळच आपल्याला सांगेल.

...

तामिळनाडूतल्या चिदंबरममध्ये १९५२ साली वेंकटरामन रामकृष्णन यांचा जन्म झाला. तिसरीपर्यंत तिथं शिक्षण झाल्यानंतर आपल्या आईवडिलांबरोबर ते गेले बडोद्याला. त्यांनी पदवी बडोद्याच्याच महाराज सयाजीराव युनिव्हर्सिटीतून घेतली. १९७१मध्ये भौतिकशास्त्रामध्ये पदवी मिळवून अनेक बुद्धिमान तरुणांप्रमाणेच ते अमेरिकेला गेले. तिथल्या ओहियो युनिव्हर्सिटीमधून त्यांनी पीएच. डी. मिळविली. पीएच.डी. करत असतानाच त्यांचं मन जीवशास्त्राकडं ओढलं गेलं होतं. पीएच.डी.च्या पुढचं शिक्षण घेत असताना १९७८मध्ये त्यांनी रायबोसोमवर काम सुरू केलं. हाच विषय आपण का निवडला याबाबत बोलताना वेंकी म्हणतात, की रायबोसोमचं स्वरूप जाणून घेणं हे अतिशय मूलभूत स्वरूपाचं काम आहे आणि त्यामुळंच मी त्याकडे ओढला गेलो. मी ज्यावेळेस या विषयावर काम सुरू केलं तेव्हा रायबोसोमच्या कोड्याची (जनुकीय साठ्याचं परिवर्तन रायबोसोमकडून प्रथिनात कसं केलं जातं) उकल करणं अवघडच नाही, तर अशक्यप्राय आहे असंच चित्र होतं. पण जीवशास्त्रातलं हे पायाभूत स्वरूपाचं काम बुद्धीला आव्हान होतं. आणि त्यामुळंच ते सतत मला खुणावत राहिलं. मी त्या विषयावर काम करू लागलो. त्याच दशकामध्ये योनाथ यांच्याप्रमाणंच स्टिटझ यांनीही रायबोसोमवर काम सुरू केलं होतं. स्टिटझ आणि वेंकटरामन हे योनाथ यांच्या कार्यात सहभागी झाले. या तिघांनी एकत्रपणानं घेतलेल्या वेधावर नोबेलची झळाळती मुद्रा उमटली. या कामाच्या दरम्यानच्या काळात वेंकटरामन केंम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये आले होते. तिथल्याच ट्रिनिटी कॉलेजचे ते फेलो झाले. केम्ब्रिजमधल्याच मेडिकल रिसर्च कौन्सिल लॅबोरेटरी ऑप मॉलिक्युलर बायॉलॉजीमध्ये संशोधन करू लागले. बायोक्रिस्टलोग्रापीमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलं. त्यामुळंच त्यांना रायबोसोमच्या स्मॉलसबयुनिटची रचना आणि रायबोसोम आपल्या कार्यात अचूकतेच्या टप्प्यापर्यंत यशस्वीपणानं कसा जातो याची उकल करता आली. रायबोसोमचं कार्य समजून घेण्याच्या दृष्टीनं ते अत्यंत महत्त्वाचं होतं. मानवीच नाही तर एकंदरच जीवनाच्या अनेक रहस्यांतील एकाची उकल करण्याची धडपड यशस्वी ठरली आणि या त्रयीला २००९ साली नोबेल पारितोषिक मिळालं. गेली अनेक वर्षं परदेशी असणार्या वेंकटरामन यांनी अलीकडच्या काळामध्ये मात्र आपल्या मायभूमीशी पुन्हा नाळ जोडून घेतली आहे. त्याच्यावरील नवीन पदाची जबाबदारी भारतातील प्रज्ञावंतांना प्रेरक ठरावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखरयुक्त आहारावर हवे नियंत्रण

$
0
0

डॉ. भक्ती सामंत, आहार तज्ज्ञ

साखरेचे खाणार त्याला देव देणार अशी एक म्हण पूर्वापार प्रचलित आहे, पण साखरेचे खाणार त्याला डायबेटिस होणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण चांगले आरोग्य राखण्यासाठी साखरयुक्त आहार कमी करा, असा संदेश जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. त्यानिमित्ताने आपण साखरयुक्त आहाराची माहिती घेण्याचा प्रयत्न करू या.

हल्लीच्या दैनंदिन जीवनात सिरील ब्रेकफास्ट ते सॉसपर्यंतच्या पदार्थांत साखरेचे प्रमाण असते. त्यामुळे हे मंद विष अनेकांच्या पोटात जात असते. आपण आज ते प्रक्रिया केलेले पदार्थ खातो. त्यात साखर दडलेली असते. ती मिठाईप्रमाणे उघडपणे दिसत नाही. पण केचअपच्या एका चमच्यात ४ ग्रॅम साखर असते. शुगर स्वीट सोड्याच्या एका कॅनमध्ये ४० ग्रॅम (सुमारे १० चमचे) साखर असते. यावरून आपल्या आहारात थेट नजरेला न पडणाऱ्या साखरेचे प्रमाण दिसून येईल. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने साखरयुक्त आहार कमी करण्याचा सल्ला दिला आहे. अतिरिक्त साखरेमुळे इन्सुलिन पातळीत वाढ होऊन चयापचय क्रियेत बिघाड होतो व उष्मांकाचे रूपांतर पोटावरील चरबी वाढण्यात होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने त्यांच्या एकूण आहाराच्या १० टक्के साखऱयुक्त आहार कमी केला, तर वजन वाढणे, स्थूलता व दात किडण्याचे प्रमाण कमी होईल.

मध्यंतरी एका संस्थेने पाहणी केली होती. त्यात वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे साखरेच्या सेवनाबाबत विश्लेषण केले आहे. ज्या प्रौढ व्यक्ती साखरेचे कमी सेवन करतात, त्यांचे वजन कमी असते. मात्र आहारात साखरेचे प्रमाण वाढल्यास वजन वाढते हे सिद्ध झाले आहे. जी मुले साखरेचे प्रमाण अधिक असलेले ड्रिंक्स पितात, त्यांचे वजन वाढलेले आढळून आले. पण जी मुले हे ड्रिंक्स कमी पितात, त्यांचे वजन कमी आढळून आले.

पोषण लेबल सक्तीचे करावे

साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी अन्नपदार्थांवर पोषण लेबल लावणे अनिवार्य करणे गरजेचे आहे. ज्या पदार्थांमध्ये किंवा बिगर अल्कोहोल पेयात साखरेचे प्रमाण आहे, त्यावर लेबल लावणे गरजेचे आहे. तुमच्या आहारात कितपत साखर आहे, हे लेबलवर पाहता येईल. उदाहरणार्थ जो शब्द शेवटच्या 'ओज' शब्दाने संपतो ते वाचावेत म्हणजे ग्लुकोज, सुक्रोज, माल्टोज हे सर्व साखरेचे प्रकार आहे. त्यामुळे साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी ही काळजी घ्यावी. त्याशिवाय मध, काकवी, मका, भात, मैद्याचा ब्रेड, भात यांचेही सेवन कमी करून ओट्स, कोंडायुक्त पीठ, हातसडीचा तांदूळ, हर्बल चहा, लिंबूवर्गीय फळांच्या रसाचा आहारात समावेश करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जगण्याचा अंधारडोह

$
0
0

राजेश चुरी

जागतिक एड्स दिनानिमित्त कामाठीपुरा वस्ती पुन्हा एकदा चर्चेत आली. काळाच्या ओघात मुंबईत अनेक बदल झाले. शरीरविक्रय करणा-या महिलांच्या जीवनातही अनेक बदल होत आहेत. त्यांची मुले आज शिकत आहेत. शिकलेली मुले त्यांच्या आयांना या वस्तीतून बाहेरही काढत आहेत. पण सर्वच महिला या वस्तीतून बाहेर पडू शकत नाहीत.

जागतिक एड्स प्रतिबंधक दिनानिमित्त मुंबईत अनेक ठिकाणी जनजागृती कार्यक्रम आयोजित केले होते. त्यातील एक कार्यक्रम कामाठीपुरा भागात झाला. मुंबईच्या सर्व भागात बदल झाले. जुन्या भागाची ओळख पुसली जाऊन नवीन ओळख मिळाली. पण या भागाची ओळख अजूनही बदलेलेली नाही. बदनाम वस्ती म्हणून बसलेला शिक्का कामाठीपुरा भागाला अजूनही बदलता आलेला नाही. ओळखही बदलली नाही आणि या भागातील सेक्स वर्कर म्हणून ओळखल्या जाणा-या महिलांची परिस्थितीही बदलेलेली नाही. दिवस अस्ताला जाताच चेह-याला रंगरंगोटी करून या महिला रस्त्यावर उतरतात. गि-हाईकांना आकर्षित करण्यासाठी तंग कपड्यांपासून वेगवेगळे उपाय योजतात. दीड-दोनशे ते पाचशे रुपयांत शरीराचा सौदा करतात. त्याच्या बदल्यात काय मिळते तर शारिरीक व मानसिक आघात आणि जोडीला एचआयव्ही एड्सची लागण. आजही काही ठराविक काळाने शरीरविक्रय करणा-या एक-दोन महिला रस्त्यात मरून पडलेल्या आढळतात. एकदा एचआयव्ही एड्सची लागण झाली तर कुटंणखान्याच्या मालकिणींच्या दृष्टीने या महिला निरुपयोगी ठरतात. त्यांना खोल्यांमधून बाहेर काढले जाते.

कामाठीपुरा भागात आजच्या घडीला शरीरविक्रय करणा-या सुमारे ३ हजार ७०० महिला असतील. त्यातील सुमारे अठराशे महिला कामाठीपु-यातील चौदाव्या गल्लीत तसेच शुकलाजी इस्टेट भागात व आसपासच्या काही खोल्यांमध्ये राहातात. इतर महिला उपनगरात वास्तव्याला आहेत. संध्याकाळ झाल्यावर या भागात व्यवसायासाठी येतात. २००० पूर्वी या भागात सुमारे ६६० कुंटणखाने होते. पण आजच्या घडीला ही संख्या दोनशेच्या पुढेमागे असल्याचे सांगण्यात येते. छोट्या खोल्यांमध्ये या महिला अतिशय दाटीवाटीने राहातात. त्यामुळे त्यांना टीबीसारखे इतर श्वसनाचे विकारही जडतात. मुळात तटपुंज्या पैशामुळे यांचा आहार अतिशय निकृष्ट असतो. त्यामुळे योग्य प्रमाणात पोषण मिळत नाही. परिणामी प्रतिकारशक्ती खालावते आणि त्यातून या महिला विविध व्याधींना बळी पडतात. पण तरीही सरकारी यंत्रणा व विविध स्वयंसेवी संस्थांच्या जनजागृतीमुळे या महिलांमधील एचआयव्ही एड्सचे प्रमाण कमी झाले आहे. सध्याच्या घडीला किमान अडीचशे महिलांना एचआयव्ही एड्सची लागण झाल्याचा काही स्वयंसेवी संस्थांचा अंदाज आहे. २००३मध्ये कामाठीपु-यात एचआयव्ही एड्सचे प्रमाण ३८.२८ टक्के होते. गेल्या वर्षी हे प्रमाण २.३४ टक्क्यांवर आले आहे.

याचा अर्थ या भागातील एचआयव्ही एड्सचे प्रमाण कमी होत आहे. पण एचआयव्ही एड्सच्या भीतीमुळे या भागातील व्यवसाय कमी झाला आहे. त्यामुळे खोल्यांची संख्याही कमी होत आहे. खोल्या रिकाम्या झाल्या तरी कोणताही कुटुंबवत्सल माणूस या भागात राहायला येण्यास तयार होत नाही. रिकाम्या झालेल्या खोल्यांमध्ये चपला, चामड्याच्या वस्तु, पर्सचे कारखाने सुरु झाले आहेत. आजूबाजुच्या हॉटेलमधील कामगार या खोल्यांमध्ये राहायला येतात. पण अजूनही कुटुंणखान्यात राहात असलेल्या महिलांचे जीवन अतिशय हलाखीचे आहे. व्यवसायात असताना या महिलांना मुलेही होतात. आपली मुले या व्यवसायात ओढली जाऊ नयेत म्हणून त्या कसोशीने प्रयत्न करतात. सध्याच्या घडीला या महिलांची सुमारे तीनशे मुले-मुली पालिकेच्या व काही खासगी शाळांमध्ये शिकत आहेत. शरीरविक्रय करणा-या महिलांच्या अपत्यांना शाळेत प्रवेश मिळणे मुश्कील असते. पण साई, प्रेरणा, नवजीवन, अपने आप अशा विविध स्वयंसेवी संस्थाच्या मदतीमुळे या मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध होत आहे. या मुलांना कुंटणखान्यातून शाळेत आणणे-नेणे, त्यांच्या गृहपाठ घेणे अशी जबाबदारी या स्वयंसेवी संस्थांनी घेतली आहे. ही मुले अर्धवट शिक्षण सोडणार नाहीत याकडेही या संस्थांचे लक्ष असते. काही वर्षांपूर्वी यातील एक मुलगा इंजिनियर झाला. पुण्याला चांगली नोकरी लागल्यावर स्वतःच्या आईला या वस्तीतून बाहेर काढले. आताही एका महिलेची मुलगी एअर होस्टेसचे प्रशिक्षण घेत आहे. ही मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहिल्यावर कदाचित स्वतःच्या आईची या नरकातून सुटका करील पण इतर महिलांचे काय होणार हा प्रश्न आहेच. त्यांच्या आजारांवर सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार होतात. पण एचआयव्ही एड्ससारख्या उपचारांमध्ये औषधांबरोबर पोषक आहारही आवश्यक असतो. पुरेशा पैशांअभावी चांगल्या दर्जाचे जेवणही मिळत नाही. स्वयंसेवी संस्थांमुळे या महिलांना काही प्रमाणात मदतीचा हात मिळत आहे. मात्र काही संस्था या महिलांना मदत मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे लाटण्याचे प्रकारही करतात. काहींचा डोळा परदेशातून येणा-या निधीवरही असतो. एक गोष्ट येवढी नक्की आहे की एचआयव्ही एड्सबाबत या महिलांमध्ये जागृती होत आहे. सुरक्षित संबंधांवर भर असतो. सरकारी यंत्रणेनेही या वस्तीकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहाण्याची गरज आहे. परदेशात काही ठिकाणी या व्यवसायाची लायसन्स दिली आहेत. आपल्याकडे अशी काही व्यवस्था नाही. सरकारने एकदा लायसन्स दिली तर मग सरकारलाही त्यांची जबाबदारी घ्यावी लागेल. या महिला समाजाचाच एक अविभाज्य घटक आहेत, हे विसरून चालणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अयोग्य आहार डायबेटिसला कारणीभूत

$
0
0

हल्ली शहरीच नव्हे, तर ग्रामीण भागातील बहुतांश व्यक्तींची जीवनशैली अतिशय धावपळीची झाली आहे. परिणामी ७० ते ८० टक्के लोकांना सकाळच्या न्याहारीत पौष्टिक पदार्थांऐवजी चमचमीत पदार्थ खाण्याची सवय लागली आहे. हल्लीच्या धावपळीत न्याहारीऐवजी पोट भरण्यावर भर दिला जात आहे. आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक खाण्याऐवजी पोट भरेल एवढेच पाहिले जाते. अशामुळे डायबेटिसचा धोका वाढत असल्याचे आढळून आले आहे.

काही वर्षांपूर्वी श्रीमंतांचा आजार मानला जाणार हा आजार घराघरात पोहोचला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे फास्ट जीवनशैली. यामुळेच फास्ट फूडचा आधार घेतला जातो. परिणामी वजनात वाढ होते. त्यामुळे भारतात सहा लोकांच्या मागे एकाला डायबेटिस असल्याचे सांगण्यात येते. रोजच्या जेवणातील आहार व मधुमेह यांचा जवळचा संबंध आहे, असे वांरवार सांगूनही अनेक जण सकाळच्या न्याहारीत चहासोबत बिस्किटे किंवा पाव खातात. दुपारी हॉटेलमधील जेवण व रात्रीच्या पार्ट्या आणि दिवसभर काम केल्याने श्रमपरिहारासाठी मद्यपान केले जाते. ही जीवनशैली केवळ शहरी भागातच नाही, तर ग्रामीण भागांतही आढळून येत आहे. त्यामुळे स्थूलपणा, उच्च रक्तदाब, व रक्तातील ग्लुकोज वाढत असल्यामुळे डायबेटिसचा धोकाही वाढतो. भारतीयांमध्ये वजन वाढण्याची समस्या वाढत आहे. योग्य वजनापेक्षा जास्त वजन असल्याची तक्रार दर तीन व्यक्तींच्या मागे एक जण करतो. तर पाच स्थूल व्यक्तींपैकी तीन जणांना डायबेटिसची लागण होत आहे.

फास्ट फूड म्हणजे फास्ट डेथ

फास्ट फूड म्हणजे फास्ट डेथ असे वर्णन केले तर अतिशोक्ती होणार नाही. त्यामुळे वडापाव, बर्गर, हॉटडॉग, पिझ्झा, पास्ताच नव्हे, तर पावभाजी, कचोरी, समोसा, चकली, गुलाबजाम, रसगुल्ला, तयार व डबाबंद मिठाया याही फास्टफूडच्या व्याख्येत येतात. जागतिक आरोग्य संघटनेनेही पौष्टिक न्याहारीवर भर देण्याचा सल्ला दिला आहे. म्हणूनच दिवसाची सुरुवात योग्य न्याहारीने झाली तर डायबेटिस हा विकार बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मह‌िलांमधील हृदयव‌िकार वाढतोय

$
0
0

मुंबईतील एका प्रख्यात हॉस्पिटलने केलेल्या महिलांच्या आरोग्यविषयक तपासणीत त्यांच्यात हृदयाशी संबंधित आजार वाढत असल्याचे आढळून आले. गेल्या पाच वर्षांत हॉस्पिटलमध्ये साडेतीन हजार महिलांपैकी ४६ टक्के महिलांना हृदयाशी निगडीत आजार आढळून आले होते. ही तपासणी हॉस्पिटलमधील होती. पण, बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक महिलांमध्ये हा आजार असण्याची शक्यता आहे. महिलांमधील या आजारांची थोडक्यात माहिती करून घेऊ या.

०००

हल्लीच्या बदलत्या काळात महिलांवरील जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. शहरी अथवा ग्रामीण भागांतील महिलांवरील जबाबदाऱ्याही वाढल्या आहेत. सध्याच्या दैनंदिन जीवनात महिलांची घर आणि ऑफीस अशा दोन्ही ठिकाणी तारेवरची कसरत सुरू असते. या दोन्ही ठिकाणच्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना त्यांच्यावर ताण येतो. त्याचा परिणाम त्यांच्या स्वास्थ्यावर होतो. अशी दुहेरी भूमिका बजावणाऱ्या महिलांपैकी सरासरी ७४ टक्के महिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास असतो. हृदयाशी संबंधित आजारासाठी हा मोठा धोका आहे. नोकरी व घरची जबाबदारी या चक्रातच त्या अडकून पडलेल्या असल्याने त्यांचे स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होते. घरच्या जबाबदाऱ्या, अयोग्य आहार व व्यायामाचा अभाव यामुळे ५४ टक्के मह‌िलांना स्थूलतेचा त्रासात होऊ लागतो. याश‌िवाय वाढते कोलेस्ट्रॉल, अनुवंश‌‌िकता, बैठी जीवनशैली व व्यायामाचा अभाव या सर्व कारणांमुळे हृदयव‌िकाराची शक्यता वाढवते.

हल्लीच्या काळात मह‌िलांमध्ये धूम्रपानाचे प्रमाणही वाढले आहे. सुमारे तीन ते चार टक्के मह‌िलांध्ये धूम्रपानामुळे हृदयव‌िकाराचा त्रास आढळून येतो. सुमारे ७० टक्के मह‌िलांमध्ये मास‌िक पाळी थांबल्यावर हृदयाशी संबंध‌ित आजाराचे निदान झाल्याचेही एका पाहाणीतून समोर आले आहे. डायबेटिसही हृदयव‌िकाराशी संबंध‌ितच आजार आहे. त्यामुळे मह‌िलांनी स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देण्याची अध‌िक गरज आहे. पुरेसा व्यायाम, योग्य आहाराबरोबर वेळोवेळी वैद्यकीय तपासण्या करण्याची गरज आहे. आपल्याकडील मह‌िला स्वतःच्या आरोग्यापेक्षा कुटुंबाच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देतात. पण, मह‌िलांनी स्वतःच्या प्रकृतीबाबत अध‌िक सजग राहाण्याची जास्त गरज आहे.

-डॉ. लेखा पाठक, हृदयव‌िकार तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुकेल्यांना घास देण्यासाठी...

$
0
0

आजपासून सहा महिन्यांपूर्वी अली हैदरी इरणाची राजधानी तेहरानच्या एका भागात उपाशी लोकांसाठी खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन आले, तर त्यांनी उपासमारीने दोन जणांना जागीच मरताना पाहिले. ही घटना त्यांना अंतर्बाह्य हादरवून गेली. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्यांनी तेथील बेघर आणि उपाशी लोकांसाठी अन्न जमा करायला सुरुवात केली. लोकांना त्यांनी राजधानीच्या शहरातील ही भीषण परिस्थिती समजावून सांगत कोणतेही खाद्यपदार्थ दान करण्यास प्रवृत्त करून ते लोकांपर्यंत पोचवण्यास सुरुवात केली.

आता सहा महिन्यांनंतर केवळ ते आणि त्यांचे कुटुंब हे काम करत नसून हजारों स्वयंसेवक देशभरातील बेघरांची उपासमार संपवत आहेत. बेघर लोक पुठ्ठ्यांवर झोपतात. त्यामुळे पुठ्ठ्यांवर झोपण्याचा अंत अर्थात पयाने कार्टुनखाबी या नावाने ते काम करतात. गरजू बेघरांना हवे तेव्हा जेवण मिळायला हवे म्हणून ते जागोजागी रेफ्रिजरेटर ठेवतात. ज्यांना जेवण दान करायचे आहे ते त्यात अन्न आणून ठेवतात आणि गरजू माणूस तेथून घेऊन ते खातो.

पेशाने जाहिरात संस्थेत व्यवस्थापक असणारे हैदर चाळीशीत आहेत. आयुष्याच्या मध्यावर समाजासाठी काहीतरी करावे, आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून त्यांनी सरकारने दुर्लक्ष केलेल्या या घटकांकडे लक्ष केंद्रित केले. त्यांच्या माहितीनुसार उपाशी असलेल्यांत ४० दिवसांच्या मुलापासून ८० वर्षांच्या स्त्रीपुरुषापर्यंतचे सारे आहेत. बेघरांमध्ये विद्यापीठाचा माजी प्राध्यापक, कवी, क्रीडापटू असे सारे आढळल्याचे ते सांगतात.

बेघरांसाठी मदत करणाऱ्या दहा वेगवेगळ्या सरकारी संस्था आहेत. मात्र त्यांच्यात कामाबद्दलची सुस्पष्टता, पारदर्शकता आणि ताळमेळ नसल्याने त्यांची जबाबदारी अखेर कोणाची याचे उत्तर सापडत नाही. हैदरी यांच्या मते, त्यांची जबाबदारी कोणी घेत नाही. पोलिस म्हणतात की ही महापालिकेची जबाबदारी आहे आणि महापालिका सांगते ती जबाबदारी समाजकल्याण विभागाची आणि गृह खात्याची.

सरकारच्या मते तेहरान आणि उपनगरांतील बेघरांची संख्या १५ हजार असून त्यात पाच हजार महिला आहेत. हैदरी यांच्या मते मात्र ही संख्या किमान दुप्पट आहे. बेघर, उपाशी लोकांची समस्या सोडविण्यासाठी सरकारकडे कोणताही ठोस कृती कार्यक्रम नाही. आणि बेघरांना कोणतेही निश्चित अधिकार नाहीत. या गुंतागुंतीत बेघरांच्या प्रश्नांची सोडवणूक कठीण बनलेली असताना हैदरी यांनी त्यावर मात करण्याचा निर्णय घेतला आणि पहिले पाऊल उचलले. मित्र आणि नातेवाइकांची मदत त्यांनी घेतलीच, शिवाय सोशल मिडियालाही त्यात गुंतवले.

जुलैमध्ये स्वयंसेवकांची पहिली तुकडी अन्न वाटपासाठी तेहेरानच्या उपनगरात रवाना झाली. अजून या स्वयंसेवकांनी कोणतीही अधिकृत संस्था स्थापन केलेली नाही. कारण ती गुंतागुंतीची बाब आहे. नोंदणी नसूनही ती आज देशातील २० हून अधिक शहरांत कार्यरत आहे. हैदरी इन्स्टाग्राम, फेसबुक आणि टेलिग्राम याला सर्व श्रेय देतात. कोणत्याही शहरात किंवा भागांत तीन लोकांनी या कामात सहभागी होण्याची इच्छा दर्शवली की तेथे त्यांचे काम सुरू होते.

रेफ्रिजरेटर ठेवण्याची संकल्पना ऑक्टोबरची. महापालिकेची परवानगी मिळाल्यावर पहिला रेफ्रिजरेटर तेहरानच्या शौष भागात ठेवला. हैदरी यांच्या म्हणण्यानुसार, अनेकांनी त्यांना तसे न करण्याचा सल्ला दिला. कारण हा भाग चोऱ्यामाऱ्यांसाठी प्रसिद्ध. २४ तासांत त्यातील जेवणच नव्हे तर सगळा रेफ्रिजरेटरच चोरीला जाईल अशी भीती घातली. किंवा एक माणूस सगळे जेवण घेऊन जाईल, असा इशारा दिला. पण तसे काही झालेले नाही. ही संकल्पना मात्र पुढे अनेक शहरांत पोचली.

आता ती अधिक उत्क्रांत होत आहे. रेफ्रिजरेटरला जोडून लोकांना कपडे दान करण्यासाठी जागा बनवली जात आहे. काही लोक पुस्तके आणि खेळणीही दान देत आहेत. हैदरी म्हणतात, आम्ही काही विशेष करत नाही, केवळ समाजाचे देणे फेडत आहोत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाजार व्यवस्थेचा तरल वेध

$
0
0

मीना देवल

'गणपती दूध पितो' ही बातमी वाऱ्यासारखी सर्व देशभर पसरली आणि जो तो गणपतीला दूध पाजायला निघाला. त्या दिवशी हजारो लिटर दूध नुसते वाहून गेले आणि अखेर हुशार चर्मकार कारागिराने केशाकर्षणाचे रहस्य या चमत्कारामागे असल्याचे दाखवले. या लाजिरवाण्या दिवसाची आठव रहावा म्हणून 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती' हा दिवस 'अंधश्रद्धा निर्मूलन दिन' म्हणून साजरा करते.

या घटनेची आठवण येण्याचे कारण, मिच अलबॉम यांचे हे पुस्तक. मृत नातेवाईकांचे फोन स्वर्गातून जिवंत व्यक्तीला येतात, या घटनेभोवती हे पुस्तक गुंफले आहे. या कल्पित घटनेच्या निमित्ताने श्र्रद्धाळू, अंधश्रद्धाळू व अश्रद्ध अशा तीनही गटांबद्दल लेखकाने भरपूर व सखोल ऊहापोह केला आहे. समाजात असे तीनही प्रकारचे लोक असतात. त्यांचा तथाकथित चमत्काराकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा विभिन्न असतो, प्रत्येकाची प्रतिक्रिया कशी वेगवेगळी येते, हे लेखकाने दाखवून दिले आहे.

स्वत‍ः लेखक श्रद्धाळू या वर्गातला असावा. कारण मनोगतामध्ये लेखक पुस्तक पूर्ण होण्याचे सर्व श्रेय देवाला देऊन मोकळा झाला आहे. कादंबरीतील सर्व घटना मिशिगन राज्यातील कोल्ड वॉटर शहरात घडतात. वास्तवात असे शहर मिशिगन स्टेटमध्ये आहे, पण हे ते शहर नव्हे असे लेखकाने स्पष्ट म्हटले आहे. मनोगतात लेखकाने आपल्या पत्नीबद्दल जे म्हटले आहे, ते लेखकाच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकते. लेखक म्हणतो 'या कादंबरीची नायिका (Gisele) किंवा अली, मार्गारेट अशा माझ्या सर्व नायिका म्हणजे माझी पत्नी जिजी हिची विविध रूपे आहेत, अन्यथा अंतःकरणापासून केलेले प्रेम मी नुसत्या कल्पनेच्या बळावर रंगवू कसा शकणार होतो?' पत्नीला दिलेली इतकी सुंदर प्रेमादराची पावती यापूर्वी कधीच वाचनात आली नव्हती.

टेलिफोन हे येथे मुख्य पात्र. लेखकाने कादंबरीतील प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगांनंतर टेलिफोनचा जनक ग्रॅहम बेल याच्या जीवनातील समांतर प्रसंग रंगवला आहे. गंमत म्हणजे, वाचताना मध्येच येणारे हे टिपण खटकत नाही. आपण दोन प्रसंगांतील साम्यस्थळे शोधू लागतो. बेलची, त्याच्या संशोधनाची, त्याच्या निर्मितीची माहिती या निमित्ताने मिळते.

एका महिलेला स्वर्गवासी बहिणीचा फोन येतो, नंतर आणखी सहाजणांना त्यांच्या मृत नातेवाईकांचे फोन येऊ लागतात. ग्रामसभेमध्ये ही मंडळी जाहीर करतात आणि एकच धमाल उडते. अमुक गावात असे फोन येत आहेत, असे पत्र एका टीव्ही चॅनलला येते, म्हणून त्या चॅनेलची वार्ताहर मुलगी कोल्ड वॉटरला येते. तिच्या प्रक्षेपणामुळे ही घटना जगजाहीर होते. मग त्याच्या खरे-खोटेपणाविषयी तर्क-वितर्क सुरू होतात. पण चमत्कारावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या जास्त असते. अर्थात, या चमत्कारास विरोध करणारा एक मोठ्ठा गटदेखील येथे आहे. मग दोन्ही बाजूंकडून येणारे मुद्दे त्यातून निर्माण झालेले गुद्दे आणि मोर्चे याचा गदारोळ उठतो. गावाचे रंगरूप बदलते. गर्दी, ट्रॅफिक जॅम, पोलिसांवर कामाचा भार अशा समस्या निर्माण होतात. या प्रसिद्धीचा फायदा उठवणारे असंख्य गाववाले आहेत. यात चर्चही मागे नाही. पूर्वी चर्चमध्ये लोकांना बोलावून आणावे लागायचे, पण आता गर्दीने चर्च भरू लागले. स्वर्गवासी नातेवाईकांचे फोन ज्यांना येतात, त्यांच्या घरासमोर बसून हे लोक भजन, प्रार्थना करतात. त्यांच्यासारखे टेलिफोन घेण्यासाठी दुकानात गर्दी उसळते. हॉटेलवाल्यांची चैन आहे. गाड्या उभ्या करण्याचे भाडे घेतले जाते, तरीही पार्किंगला जागा उरलेली नाही.

या गदारोळात एक गोष्ट जाणवत राहते व ती म्हणजे या मंडळींपैकी कोणीही देवाधर्माचा, स्वर्गाचा, चमत्काराचा विचार करत नसून फक्त आर्थिक फायदा बघत आहेत. सर्व गोष्टींना येणारे बाजारी स्वरूप या कथानकाद्वारे लेखक एका तरल पातळीवर शब्दबद्ध करतो व हेच या पुस्तकाचे यश आहे.

द फर्स्ट फोन कॉल फ्रॉम हेवन, लेखकः मिच अलबॉम, प्रकाशकः हार्पर अँड कॉलिन्स, पानेः ३२३ (पेपरबॅक)

किंमतः १०.०६ डॉलर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वरसाधकाचा संगीत ‘सुयोग’

$
0
0

संगीत क्षेत्राला अलीकडे आलेले ग्लॅमर पाहता, तरुण पिढीतील अनेक या क्षेत्राचा करिअरसाठी गांभीर्याने विचार करतात. अर्थात, बहुतेकांचा कल हा गायक कलाकार बनण्याकडे किंवा ग्लॅमर असलेले वाद्य वाजविण्याकडे असतो. सुयोग कुंडलकरने मात्र हार्मोनियम वादन हेच करिअरचे क्षेत्र असेल, असे निश्चित केले आणि त्यावर यशस्वी वाटचाल केली. सुयोगचे वेगळेपण असे, की एकतर त्याने हार्मोनियम वादनात करिअर करण्याचे नक्की केले, ते वयाच्या सोळाव्या वर्षी आणि हार्मोनियमची ही साथ केवळ रागसंगीतासाठी (शास्त्रीय संगीत) असेल, हे निश्चित केले विशीत! संगीतात करिअरचा निश्चय करणे, त्यातून हार्मोनियमसारखे रुढार्थाने ग्लॅमर नसलेले वाद्य वाजवणे, तेही केवळ रागसंगीत मैफलीत वाजविण्याचा निर्णय करणे आणि त्यावर कायम राहणे, ही सोपी गोष्ट नाही. अंगभूत गुणवत्तेला दिलेली कठोर साधनेची, चिंतनाची, अभ्यासाची आणि परिश्रमांची जोड यामुळे सुयोग कुंडलकर हे नाव आज नावाजले जाते. सुयोग हा किशोरी आमोणकर, मालिनी राजूरकर, उल्हास कशाळकर, अश्विनी भिडे-देशपांडे यांचा हक्काचा साथीदार आहे, इतका उल्लेखही त्याची या क्षेत्रातील गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी पुरेसा आहे.

सुयोगच्या घरात खरेतर संगीताची पार्श्वभूमी नाही. त्याचे हार्मोनियमशी सूर जुळले, ते त्याच्याही नकळत. शाळेत गाण्याच्या तासाला त्याचे लक्ष असायचे ते पेटीकडे आणि तिच्यातून निघणाऱ्या नादाकडे. पेटीवर फिरणारी बोटे त्याला नादावून जायची आणि मग आपसूक एखाद्या उशीवर पेटी वाजविण्याचा प्रयोग सुरू व्हायचा. आई-वडिलांनी त्याची ही आवड ओळखून इयत्ता दुसरीत सुयोगला रंजना गोडसे यांच्याकडे हार्मोनियमचे औपचारिक शिक्षण घेण्यासाठी धाडले. आवड होतीच, त्याचे हळुहळू 'पॅशन'मध्ये रूपांतर झाले. शाळेच्या गॅदरिंगमध्ये, छोट्या-मोठ्या कार्यक्रमांत सुयोग हार्मोनियमची साथ करू लागला. गोडसे यांच्याकडे आठ-दहा वर्षे तो शिकला. मूलभूत रागरूपे, त्यांच्या बंदिशी याची तयारी झाली. आता थोडे पुढे जायचे होते. महत्त्वाच्या टप्प्यावर दिशा देणारा गुरू भेटणे खूप आवश्यक असते. सुयोगचे भाग्य असे, की त्याला आयुष्यातील महत्त्वाच्या वळणावर डॉ. अरविंद थत्ते यांच्यासारखा गुरू लाभला. तोवर त्याला हार्मोनियम वाजवता यायला लागली होतीच. थत्ते यांनी सुयोगला हार्मोनियम वाजवण्याची दृष्टी दिली. सुयोग सांगतो, 'हार्मोनियम या वाद्यातील बारकाव्यांपासून त्याच्या ट्युनिंगपर्यंतची सखोल तांत्रिक माहिती तर मला मिळालीच; पण थत्ते यांच्याशी होणारा संगीतविषयक संवाद, साथीदार म्हणून ते गायकांना कशी साथ करतात, हे ऐकण्याचा रियाझ अशा अनेक गोष्टी मी त्यांचे बोट धरून केल्या.'

सन १९९७मध्ये सुयोगला साथीदार म्हणून पहिली मोठी संधी मिळाली, ती गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांना हार्मोनियमची साथ करण्याची. त्यानंतर श्रीमती गंगूबाई हनगळ, बाळासाहेब पूंछवाले, पद्मावती शाळीग्राम, किशोरी आमोणकर, प्रभा अत्रे, यशवंतबुवा जोशी, गिरिजा देवी, बबनराव हळदणकर, वसुंधरा कोमकली, मालिनी राजूरकर, जयश्री पाटणेकर, उल्हास कशाळकर, वीणा सहस्रबुद्धे, रशीद खान, मुकुल शिवपुत्र, आरती अंकलीकर-टिकेकर, कलापिनी कोमकली अशा अनेक कलाकारांना त्याने हार्मोनियमची साथ केली. देश-विदेशात त्याने अनेक कार्यक्रम आणि महोत्सवात भाग घेतला आहे. मानाच्या सवाई गंधर्व-भीमसेन संगीत महोत्सवातही त्याची साथीदार म्हणून उपस्थिती असते. सुयोग आकाशवाणी आणि दूरदर्शनचा 'बी हाय' श्रेणीचा कलाकार आहे. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) रेफरन्स पॅनेलवरही तो आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात तो अध्यापनही करतो.

सुयोगचा वादक म्हणून झालेला हा प्रवास लोभस असला, तरी तो सुलभ होता, असे नाही. कठोर साधना आणि परिश्रमांच्या जोरावरच हा प्रवास होऊ शकला. सुयोग सांगतो, 'अकरावीत असतानाच मी मनाशी निश्चय केला होता, की मला हार्मोनियममध्येच करिअर करायचे आहे. मी हे घरी सांगितल्यावर माझ्या पालकांना प्रथम थोडी भीती वाटली. आमच्याकडे मुळात संगीताची पार्श्वभूमी नव्हती आणि त्यामुळे यातील करिअरबाबत काही माहिती नव्हती. अर्थात, त्यांनी विरोध मात्र केला नाही. 'आम्ही पाठीशी आहोत,' हा दिलासा त्यांनी दिला. त्यानंतर खऱ्या अर्थाने माझी जबाबदारी वाढली...' करिअर कशात करायचे हे नक्की झाले; पण म्हणजे केवळ हार्मोनियम शिकणे आणि कार्यक्रम करत राहणे एवढ्यावरच लक्ष केंद्रित करणे, असे त्याने कधी केले नाही. जास्त भर त्यावर असला, तरी जोडीने इतर कलांचा आस्वाद घेत राहणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सुयोग मानतो. एका बाजूला अरविंद थत्ते यांच्याकडे शिक्षण आणि संगीत संवाद सुरू असताना, त्याने ललित कला केंद्रातून संगीताचे पदवी शिक्षण पूर्ण केले. जोडीला संगीत ऐकणे सुरू होते. अतिशय दुर्मिळ अशा मैफलींसह सुमारे दोन हजार कॅसेटच्या संचांचा त्याने संग्रह केला होता. आणि या कॅसेट त्याच्या कानावर आणि पर्यायाने मनावरही संस्कार करत होत्या. सुहास दातार आणि ललिता खाडिलकर यांच्याकडे तो शास्त्रीय गायनही शिकला. उत्तम साहित्याचे वाचन, चित्रपट पाहणे, चित्र प्रदर्शनांना भेट देणे, इतरांचे गाणे, वादन ऐकणे हेही सुयोगने जाणीवपूर्वक अभ्यासाचा भाग म्हणून केले आणि अजूनही हे तो करतो. 'सर्जनशीलता म्हणजे केवळ रोज काही तरी नवे सुचणे नाही. कलाकार म्हणून विविध कलांमधील सौंदर्याचा आस्वाद घेत राहणे, हीदेखील सर्जनशीलता आहे. या आस्वादातून आपल्यातील नवे बाहेर येत असते,' असे सुयोग म्हणतो.

हार्मोनियम या वाद्याचे स्वतंत्र वादनाचेही प्रयोग व्हायला हवेत, या भावनेतून सुयोग स्वतंत्र हार्मोनियम वादनाचे प्रयोग करतो आहे. त्याचप्रमाणे त्याने स्वतः काही बंदिशी रचल्या आहेत. 'रागचित्र' या नावाने त्याचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिल्ला खान पुरस्कार, सवाई गंधर्व महोत्सवात देण्यात येणारा रसिकाग्रणी दत्तोपंत देशपांडे पुरस्कार, भारत गायन समाजाचा पं. बाळासाहेब माटे स्मृती पुरस्कार, गोडसे वाद्यावादन विद्यालयाचा श्रीमती रंजना गोडसे स्मृती पुरस्कार असे काही मानाचे पुरस्कारही त्याला मिळाले आहेत. त्याने आणि त्याची पत्नी गायिका आरती ठाकूर यांनी अभिजात संगीतातील प्रयोग मांडण्यासाठी 'बासरी फाउंडेशन' हे व्यासपीठही तयार केले आहे. संगीतासारख्या वलयांकित क्षेत्रातील ग्लॅमर नसलेले वाद्य वाजवण्यात करिअर करण्याचा निश्चय करूनही सुयोगचे आयुष्य सुरेल वळणावर वाटचाल करत आहे. गुणवत्ता, साधना, परिश्रम आणि त्याला अभ्यासाची जोड दिल्यास हे साध्य होते, याचे सुयोग हे एक श्रुतिमनोहर उदाहरण ठरावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायलेंट किलर

$
0
0

>> डॉ. स्मिता नरम, वैद्यकीय सल्लागार

हल्लीच्या काळात डायबेटिसचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाला याबद्दल माहिती जाणून घेण्याची इच्छा असते. यावर दररोज नवनवीन संशोधन व नवीन माहितीची भर पडत आहे. खास करून आहारावि‌षयी अनेक जण जागरुक होत आहे. अशांसाठी आजार व आहाराबाबत थोडी नवीन माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे...

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या आयुष्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक जण कामाच्या व्यापाच्या नावाखाली प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात. परिणामी अनेक आजार जडण्याची शक्यता असते. त्यातील चोरपावलांनी येणार आजार म्हणजे डायबेटिस. कोणतीही चाहूल न देता हा शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे त्याला सायलेंट किलर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे तुमचे वय जर ३५पेक्षा अधिक असेल, बैठे व तणावपूर्ण काम करत असाल किंवा घरात कोणाला डायबेटिस असेल तर तातडीने रक्त शर्करेचे मापन करण्याची गरज आहे. भविष्य चांगले होण्यासाठी वर्तमानातच पावले उचला.

डायबेटिसवर वेळीच उपचार सुरू केले नाहीत किंवा उच्च रक्त शर्करेचे प्रमाण दुर्लक्षित राहिल्यास गुंतागुंत ‌निर्माण होते. त्यातील काही आजारांची माहिती थोडक्यात घेऊया.

मज्जासंस्थेचे विकार

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने सूक्ष्म रक्तवाहिन्यांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे बोट, पाय, तळवे इत्यादी अवयवांना मुंग्या येणे किंवा सुन्न पडणे अशी लक्षणे जाणवू लागतात. या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर ज्या अवयवांना त्रास होतो ते अवयव गमावण्याची वेळ येऊ शकते.

हृदयासंबंधीचे आजार

डायबेटिसमुळे छातीत दुखणे, पक्षाघात, रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता वाढते.

मूत्रपिंडाचे विकार

रक्तातून टाकाऊ पदार्थ बाहेर काढणाऱ्या नाजूक अशा रक्तवाहिन्यांना रक्तशर्करेचे अधिक प्रमाण धोकादायक ठरते. त्याचा मूत्रपिंडावर परिणाम होऊ शकतो.

डोळ्यांचे विकार

डायबेटिस पेशंटमध्ये सर्वात जास्त डोळ्यांचे विकार आढळून येतात. डोळ्यातील सूक्ष्म रक्तवाहिन्यांना डायबेटिसमुळे धक्का पोहोचतो. ज्यामुळे मोतीबिंदू, काचबिंदू किंवा कायमचे अंधत्व येण्याचीही शक्यता असते. त्यामुळे वेळीच काळजी व आहारात चांगले बदल करण्याची गरज आहे. त्याची माहिती आपण लेखाच्या पुढील भागात घेऊया.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी शाळांचे भवितव्य

$
0
0

>> सीमा शेख- देसाई

मराठी शाळांमधील दरवर्षी घटणारी पटसंख्या ही भाषेचीच दयनीय अवस्था दाखवत आहे. एकीकडे मराठीबद्दलचे ऊतू जाणारे राजकीय प्रेम आणि दुसरीकडे शालेय स्तरावरच भाषेला लागलेली उतरती कळा या दोन्ही गोष्टी मराठी भाषेचे भविष्य किती दिवस उज्ज्वल ठेवू शकतील, याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे.

डावा हात डोक्यावरून घेऊन उजव्या कानाला पोहोचला की पोराला शाळेत घालण्याची आपल्याकडची अनेक वर्षांपूर्वीची परंपरा. जन्मदाखले उपलब्ध नसायचे, जन्मतारीखदेखील पालकांना माहीत नसायची. त्यामुळे हा ठोकताळा ठरलेला. मग शिक्षणाचा कित्ता गिरवायचा सुरुवात व्हायची. कालांतराने शालेय प्रवेशांची प्रक्रिया सुरू झाली. मुलाखती व्हायच्या. मात्र, मुलांच्या मनावर आणि बुद्धीवर ताण द्यायचा नाही, म्हणून मुलाखतींनादेखील परवानगी नाकारली जाऊ लागली. मग नुसते नाव, पालकांचे नाव विचारून प्रवेश मिळू लागले. त्यानंतर प्रवेश मिळविण्यासाठी चढाओढ लागली. पालक रात्रभर शाळेपुढे रांगा लावत असत. क्रमानुसार रांग लावण्यासाठी पालकांमधूनच पुढाकाराने नावांची यादी केली जात असे. त्यानुसार प्रवेश अर्ज मिळत असत. मग प्रवेशासाठी रांगेत असलेले पालक शिकोटी पेटवून गप्पांमध्ये रात्र घालवत असत आणि अखेर दुसऱ्या दिवशी प्रवेश अर्ज हातात घेऊन आनंदाने घरी जात असत. हळुहळू ही परिस्थिती बदलू लागली. बऱ्याच शाळा एक डिसेंबरला ऑनलाइन अर्ज देऊ लागल्या. इंग्रजी माध्यमाकडे जसा ओढा वाढू लागला, तसे हे प्रमाण वाढले.

अलिकडे, गेल्या चार ते पाच वर्षांत शाळा प्रवेशांचे चित्र पारच पालटले आहे. मराठी शाळांकडचा ओढा कमी होतोय, अशा बातम्या दोन वर्षांपूर्वी लिहिल्या जात होत्या. आता तर मराठी शाळांमध्ये प्रवेशासाठी पालक फिरकतच नाहीत, हे वास्तव समोर येत आहे. आईबापांना इंग्रजी समजलं नाही तरी चालेल, पण पोरगं इंग्रजीत शिकलं पाहिजे, दोन-चार घरची कामं जास्त करायला लागली तरा चालेल, पण पोराला इंग्लिश शाळेत घालायचं.. अशा अर्धवट विचारांमधून, माहितीमधून पालक मुलांना इंग्रजी शाळांच्या हवाली करतात आणि अनेकदा फसतातदेखील.

कोणत्याही मुलाचे प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतच झाले पाहिजे, असे प्रबोधन अनेक शिक्षण तज्ज्ञांनी, अभ्यासकांनी करूनसुद्धा सामान्यपणे पालक आता इंग्रजी शाळेकडेच वळतात. अमक्याचा पिंटू, तमक्याचा राजू, वहिनींची सोनू, काकींची पिंकू पण इंग्रजी शाळेत जाते, असे सांगत अभिमानाने स्वतःच्या मुलाला, मुलीला इंग्रजी शाळेत घालणारे अनेक पालक आहेत. इंग्रजी शाळा म्हणजे नेमके काय, याची संकल्पनादेखील त्यांना माहिती नसते. पूर्वी इंग्रजी शाळा म्हणजे मिशनरी स्कूलचे वातावरण अशी कल्पना असे. मात्र, आता पालकांची गरज ओळखून शिक्षण संस्थांनीदेखील मराठमोळ्या संस्कारातील इंग्रजी (सीबीएसई, आयसीएसई, इंटरनॅशनल स्कूल) शाळा सुरू केल्या. या शाळांवर तर मराठी पालकांनी उड्याच मारल्या. आपलं पोरगं हे मराठी संस्कारातलं राहिलं पाहिजे आणि शिक्षण मात्र साहेबाच्या शाळेतूनच मिळालं पाहिजे, या पालकांच्या मनातल्या सुप्त इच्छा या शाळांमधून पूर्ण होऊ लागल्या.

यंदाची परिस्थिती दयनीय

यंदा शिक्षण संस्थांमधील मराठी शाळांची परिस्थिती दयनीय आहे. नवीन शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू होऊनही काही शाळांमधून हाताच्या बोटावर मोजण्याइतके अर्ज गेलेत, तर काही ठिकाणी पालकांनी अर्जही नेलेले नाहीत. शैक्षणिक स्पर्धेत आपलं मूल मागे राहू नये, या काळजीने पालक मराठी शाळांकडे पाठ फिरवत आहेत. मात्र, स्पर्धेत पाल्य मागे का आणि कशामुळे राहतो, याचा पालकांनीही अभ्यास करणे गरजेचे आहे. मराठी शाळांऐवजी मराठी भाषेलाच घरघर लागली आहे, असे म्हणावे लागेल. काळानुरूप भाषेत जो बदल झाला पाहिजे, तो आपल्याकडे झालेला नाही. १९व्या शतकात इंग्रजांनी बदल केले मात्र, आताही आपण त्याचेच अनुकरण करत आहोत. बोली भाषा आणि प्रमाण भाषा यात नेमका फरकच केला जात नाही. विज्ञानासाठी प्रमाण भाषेचा वापर केला जात नाही. व्यवहारात वापरले जाणारे शब्द अभ्यासात गरजेच्या ठिकाणी वापरले गेले पाहिजेत. हा आवश्यक बदल आतापर्यंत अभ्यासक्रमांमधून करता आला नाही. राजकीय उदासीनता याला कारणीभूत आहे.

शिक्षकांवर कामाचा बोजा

मराठी भाषेचा अभिमान जरूर असावा. मात्र, गरजेनुसार पर्यायी शब्दांचा वापरही केला गेला पाहिजे. त्याची अंमलबजावणीच आपल्याकडे होत नाही. आपण केवळ वाद घालतो. मुलांच्या विकासासाठी आणि अभ्यासक्रम अधिक सोपा होण्यासाठी प्रयत्न करत नाही. मराठी शाळांमध्ये अशैक्षणिक कामांचा बोजाही शिक्षकांवर असतो. त्यामुळे अपेक्षितपणे दर्जा राखला जात नाही. हे सगळे इंग्रजीच्या वाट्याला येत नाही. त्यामुळे पालक इंग्रजीला प्राधान्य देतात. त्याहीपेक्षा सीबीएसईकडे वळतात. शिक्षक कितीही चांगले असले, तरी आपल्याकडील धोरणांमुळे काही वेळा अडचणी येतात. इंग्रजी शाळांना स्वातंत्र्य असते. मराठी अनुदानित शाळा मात्र, धोरणात बांधल्या जातात. मराठी शाळेत घातले, तर मुलाला पुढील शिक्षणाला अडचण येईल, अशी पालक भीती बाळगतात. इंग्रजी शाळेत व्यवस्थापनाचेच वर्चस्व असते. त्यामुळे सरकारला त्यात हस्तक्षेप करता येत नाही.

बोर्डानेही विचार करावा

अधिकाधिक पालक आपली मुले सीबीएसई किंवा आयसीएसई बोर्डात घालत आहेत. त्यामुळे मुले मराठी भाषेला मुकतात. खरे तर ही मुले महाराष्ट्र बोर्ड सोडून इतरत्र का जातात, इतरत्र का जातात, याचा शिक्षण मंडळानेदेखीव विचार केला पाहिजे. प्रत्येक बोर्डाला मराठीचा पेपर अनिवार्य करावा, असा प्रस्ताव २००९ मध्ये शासनाने ठेवला होता. त्याच्या काटेकोर अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह आहे. खरेतर महाराष्ट्रात माध्यमिक परीक्षा घेणाऱ्या शासनाच्या सर्व प्रकारच्या माध्यमिक शिक्षण मंडळांसाठी मराठी विषय अनिवार्य असावा. शैक्षणिक अभ्यासक्रमातून

मराठी हळूहळू बाहेर फेकली जात आहे, हे चित्रच वास्तव आहे. मराठीचा बळी देऊन इंग्रजी शिकण्याची वृत्ती निर्माण होत आहे. इंग्रजी शिकणारी मुले व्यवहारातही मराठी भाषा बोलत नाहीत, असे दिसते. कुटुंबात मुलांसाठी म्हणून इंग्रजी संभाषण होत असेल, नातेवाईक परदेशात असतील तर पर्यायाने मुलांना मराठी संभाषणाची सवयच राहात नाही.

शाळेतल्या 'कल्चर'ला महत्त्व

आपला पाल्य ज्या शाळेत शिकतो, तेथील वातावरणाला पालक नेहमीच प्राधान्य देतात. झोपडपट्टी परिसरातील मुलांना त्यांचे पालक आता शहरातील खासगी शाळांमध्ये पाठवितात. त्यामुळे अशा मुलांबरोबर आपला पाल्य नको, वाईट संगत लागेल, अशा विचारानेदेखील इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेण्याचे प्रमाण वाढले आहे.

जबाबदार आपणच

आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही पालक इंग्रजी शाळेच्या भरमसाठ फी भरतात आणि मराठीकडे पाठ फिरवतात, हे सगळीकडचे चित्र आहे. अनुदानित शाळा, त्यांना लागू होणारे नियम, त्यानुसार येणारे आरक्षण, शिक्षकांची गुणवत्ता, आर्थिक प्रश्न असा असा यातला गुंता वाढतच आहे. भाषा आणि भाषेचे मुद्दे यावरून आपल्याकडे केवळ वादच घातले जातात. भाषेची सध्याची परिस्थीत आपण ओढवून घेतलेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा हवी करपरती!

$
0
0

मराठी चित्रपटांची अवस्था सध्याच्या भारतीय समाजासारखीच झाली आहे. ऐंशी टक्के संपत्ती वीस टक्के लोकांच्या ताब्यात आण‌ि उर्वरित ऐंशी टक्के जनतेच्या हाती केवळ वीस टक्के संपत्ती. यातून भारतात सगळीकडे पैसा खुळखुळत असल्याचा केवळ भास निर्माण होतो. मराठीत वर्षाला सध्या जेवढे चित्रपट निर्माण होतात त्यातील केवळ वीस टक्के चित्रपटांची मोठ्या प्रमाणात जाहिरात करण्याची कुवत असते. त्या मोजक्या चित्रपटांवरच वाहिन्यांचीही सशर्त माया असते. या सततच्या माऱ्यामुळे मराठी चित्रपटांची अवस्था फार चांगली असल्याचा गैरसमज मात्र निर्माण झाला आहे. प्रत्यक्षात तिकीट खिडकीवर धंदा करणारे चित्रपट अत्यंत कमी आहेत आण‌ि विषयांचे वेगळेपण मुबलक असले तरी आशयात्मक ‌दिवाळखोरीचा सुकाळ आहे. आता सरकारी अनुदान पात्रता समितीने वर्गवारी करण्याच्या निकषांची कडक अंमलबजावणी करण्याचे ठरवले असेल तर तिचे स्वागतच केले पाहिजे. मुळातच सरसरकट अनुदानाची पद्धत बंद करून व्ही. शांताराम यांनी सुचवली होती तशी, महाराष्ट्र सरकाने एकेकाळी राबवलेली करपरतीची पद्धतच सर्व दृष्टींनी मराठी चित्रपटांसाठी उपकारक आहे. चित्रपटामुळे सरकारकडे जेवढा मनोरंजनकर जमा होईल त्यात तेवढीच भर घालून त्या निर्मात्याला देण्याचे धोरणच मराठी चित्रपटांच्या प्रगतीसाठी आजही योग्य आहे. खरेतर मराठी माणसाची, महागडे तिकीट खरेदी करण्याची कुवत आण‌ि मानसिकताही तयार झाली असल्याने करपरतीचा आता जास्त फायदा होईल. सरकारदरबारी सतत खेटे घालणाऱ्या स्वार्थी नि‌र्मात्यांनी काही वर्षांपूर्वी मूळ योजना बासनात गुंडाळून अनुदानाच्या खिरापती सुरू करून घेतल्या होत्या. त्यानंतर चित्रपटांची संख्या वारेमाप वाढली आण‌ि गुणवत्ता मात्र घसरली, हे लक्षात घेतले पाहिजे. जाहीर किंवा मंजूर झालेले अनुदान कधी मिळेल याबाबत कोणतेही निश्चित वेळापत्रक नसते. त्यामुळे केवळ चित्रपटनिर्मिती हाच ज्यांचा ध्यास आहे, त्यांना या अनुदानाचा काडीचाही उपयोग होत नाही आण‌ि उपटसुंभांचे मात्र फावते. ज्या चित्रपटांना शासनमान्य राज्य पुरस्कार क‌िंवा राष्ट्रीय पुरस्कार मिळतील त्यांनाच केवळ भरघोस अनुदान देऊन आशयात्मक श्रीमंतीच्या पाठिशी उभे राहण्याची भूमिका आता सरकारने घेतली पाहिजे. मात्र, हे करायचे असेल तर हितसंबंध असलेल्यांना दुखावण्याची हिंमत सरकारला दाखवावी लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाहणीवर पाणी

$
0
0

नरेंद्र मोदी बराच काळ संघाचे प्रचारक होते. आता त्यांनी पंतप्रधान म्हणून केलेले विदेशदौरे तेथील 'जाहीर सभां'मुळे बरेच गाजले. आता त्यांच्या देशीय दौऱ्यांचीही जाहीर चर्चा होऊ लागली आहे. निवडणूक दौऱ्यात त्यांनी ज्या पद्धतीने बिहारला पॅकेज देऊ केले त्या भूमिकेवर बरीच टीका झाली. राज्याला सरकारी मदत देतानाचा त्यांचा प्रचारकी अविर्भाव अनेकांना खटकला. त्यांच्यावर देशभरातून टीकेची झोडही उठली. पंतप्रधानांचा मूळ प्रचारकी पंथ काही सरकारी अधिकाऱ्यांनी तर स्वीकारला नाही ना, असा संशय घेणारी घटना नुकतीच घडली. यात मोदींचा दोष नसेलही, मात्र देशातील महत्त्वाच्या नेत्यांविषयीची कुठलीही माहिती मूळ संदर्भासह पोहोविण्याच्या अधिकार हिरावला गेल्याची लोकभावना झाली आहे. मोदी यांच्या चेन्नई दौऱ्यातील गाजावाजा प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या (पीआयबी) कृपेने झाला. महाभयंकर प्रलयाने चेन्नईतील जनजीवन अस्ताव्यस्त झाले. एकीकडे सर्व विमानसेवा खंडित झाली असताना पंतप्रधानांनी विशेष हवाई पाहणी करून पूरग्रस्त चेन्नईचा आढावा घेतला. त्या दौऱ्यातील पाहणीच्या मूळ छायाचित्रात मोडतोड करून ते अधिक प्रभावी करण्याचा उपद‍्व्याप पीआयबीला चांगला भोवला. बुडालेल्या शेतींचे धूसर छायाचित्र हटवून जलमय इमारतींचे स्पष्ट छायाचित्र पीआयबीच्या अधिकाऱ्यांनी संकेतस्थळावर टाकले. सजग जनतेला त्यातील खोटेपणा लक्षात आल्याने सोशल मिडियातून सरकारवर चांगलेच वार झाले. अखेर हे छायाचित्र मागे घेण्याची नामुष्की पीआयबीवर ओढवली. 'निवडीमधील चूक' असल्याचे सांगत सरकारी घोळ निस्तरण्याचा प्रयत्न झाला. पाठोपाठ दिलगिरी आली. तसे पाहिले तर सोशल मिडियावरील छायाचित्रे अनेकदा चूक असतात. खोटे संदर्भ बरेचदा फॉरवर्डही होतात. मागे एसिआन शिखर बैठकीत भारत आणि जपानच्या पंतप्रधानांच्या भेटीतील उलट्या तिरंग्याची चर्चा रंगली, मात्र तो फोटोच चूक निघाला. चेन्नईतील मोडतोड मात्र 'राजनिष्ठ' सरकारी अधिकाऱ्याची असल्याने ती बाब गंभीरतेने घ्यायला हवी. वीजबचत आणि निर्मितीच्या सरकारी प्रयत्नांना पुरेशी प्रसिद्धी मिळाली नसल्याची खंत पंतप्रधानांनी शुक्रवारी व्यक्त केली. सरकारी अधिकाऱ्यांनी हा मुद्दा गांभिर्याने घेण्याएवजी प्रसिद्धीची नको ती तजवीज करावी ही गोष्ट खटकणारी आहे. सरकारने माहितीत खोडसाळपणा करण्याऐवजी वास्तविकता पोहचविण्यावर भर द्यावा. आपल्या उत्साहामुळे पंतप्रधानांच्या दौऱ्याचे गांभीर्य उणावले, हे माहिती अधिकाऱ्यांनी विसरू नये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हावे कलेचे ठाणे!

$
0
0

>> विजयराज बोधनकर

भ्रमंती ही बरेचदा भ्रम दूर करते. त्यासाठी तरी आपल्या देशात फिरावे. म्हणजे बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतात. समाजाचा असाच एक प्रश्न आहे. चित्रशिल्पातलं आपल्याला कळत नाही बुवा! पण त्यासाठी गॅलरीत जाऊन चित्र-शिल्प प्रदर्शन पाहायला हवं. कलावंतांशी बोलायला हवं. समजून घ्यायला हवं. मग आपण जातो का, पाहतो का, बोलतो का? तर बरेचदा उत्तर येऊ शकतं, ते म्हणजे 'नाही'! या 'नाही'ला एक उत्तर आहे. ते अगदी सोपं आहे. सहज वाटेवर, सहज गर्दी जमणाऱ्या जागेवर एखादी नवीन गोष्ट असेल, तर आपण सहज पाहतो. पण ती पाहण्यासाठी कुणी चला म्हटलं की, आपण लगेच टाळतो. याचाच अर्थ काय, तर सहज दिसत असेल, तर ते आपण पाहतो, त्या गोष्टीचा रसास्वाद घेतो. मग ती गोष्ट आपल्या मनाशी जोडली जाते.

हीच गोष्ट चित्र-शिल्प प्रदर्शनाला लागू पडते. या क्षणाला माझ्या चित्रांचे प्रदर्शन कोलकात्याला चालू आहे. अॅकॅडमी ऑफ फाइन आर्ट हे गॅलरीचे नाव आहे. गॅलरीचा सभोवताल सृष्टीने नटलेला आहे. जागोजागी प्रसिद्ध शिल्पे ठेवलेली आहेत. या गॅलरीला जोडून नाट्यगृह आहे. रसिकांना बसण्यासाठी कट्टे केले आहेत. आत खाण्यापिण्यासाठी गार्डन रेस्टॉरंट आहे. एकाला एक जोडून चांगल्या चार गॅलरी आहेत. या वास्तूला वाहता रस्ता जोडून आहे. जवळच मेट्रो स्टेशन आहे. या वास्तूच्या मागे पुन्हा एक मोठ्ठं थिएटर आहे. यालाच जोडून एक ओपन ग्राउंड आहे. तिथे नाटक, संगीत, काव्य, नृत्याचे खुले कार्यक्रम चालतात. बाराही महिने चालतात. या जागेवर लांबून लांबून कलारसिक येतात. कुणी चित्रशिल्प पाहायला, तर कुणी नाटक, कुणी चित्रपट. एक पाहिलं की, दुसरी कला पाहतात. त्याची साखळी जोडलेली असल्यामुळे कुठलीही कला त्यांच्या नजरेतून सुटत नाही.

हे असे का घडते, तर यालाच म्हणतात, मायक्रो प्लॅनिंग. कलाहित आणि समाजहित यांचा खोलवर विचार करणारी मंडळी एकत्र आली आणि याची सूचना केली. तिला यश मिळालं. लोंढेच्या लोंढे येताना दिसतात. चित्र-शिल्प पाहतात, चर्चा करतात. ही सवय कोणी लावली, तर एका समन्वयाच्या वृत्तीने लावली. सत्तर- पंच्याहत्तर वर्षांपासून इथे गर्दीने बाळसं धरलं. आज सहजतेचं धोरण या वास्तूने अमलात आणलं. पहिल्याच दिवशी आमच्या प्रदर्शनाला प्रचंड गर्दी झाली. चर्चाही झाली. चित्रातलं फारसं आम्हाला समजत नाही, असं कुणाच्याही तोंडून ऐकायला मिळालं नाही. याचं प्रचंड समाधान एक कलावंत म्हणून मला मिळालं.

आपल्या जवळच्या पुणे शहरात असंच वातावरण आहे. बालगंधर्व नाट्यगृह आणि कलादालन एकत्र आहे. पुण्याला चित्र पाहायला कलारसिक एकत्र येतात, कलेविषयी बोलतात. वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये आर्ट गॅलरीच्या बाजूला गुजराथी नाट्यगृह आहे. तिथे सतत नाटक, संगीत, नृत्याचे कार्यक्रम चालू राहतात. त्याचं पब्लिक मग प्रदर्शन पाहायला येतं. आणि मग होतो साक्षात्कार चित्रसाक्षरतेचा. आपल्याही ठाणे जिल्ह्यात, शहरात असा साक्षात्कार होऊ शकतो. तीन दिवस ठाणे उपवन फेस्टिव्हलला जो कलारसिक आला होता, तोच कलारसिक मग कायमचा कलेशी जोडला जाऊ शकतो. कला साक्षरता जोर धरते. त्यावर चर्चा होऊ शकते. ठाणे शहराला कलेची अधिक प्रभावळ मिळू शकते. कुठलीही गोष्ट होऊ शकते. त्यालाच शक्यता म्हणतात. कोलकात्यासारखेच कसारसिक राजमान्य, रसिकमान्य, समाजमान्यवर एकत्र आले, तर! एकत्र आले, तर सरस्वतीचा वरदहस्त ठाणे शहराला मिळेल. नाट्यगृह, चित्रपटगृह आणि आर्ट गॅलरी एकत्र आणणारे मनोबल जेव्हा हातात हात घालून चालेल, तेव्हा हा सकारात्मक साक्षात्कार नक्की घडेल.

म्हणून प्रारंभी म्हटल्याप्रमाणे भ्रमंती ही बरेचदा भ्रम दूर करते. काल एका ललित लेखकाचा मला मेसेज आला- 'चित्रातलं फारसं कळत नाही, पण प्रदर्शनाला शुभेच्छा! यावरून हेच सिद्ध होतेय की, त्याची भूक आहे चित्र समजून घेण्याची. तो अव्वल दर्जाचा ललित लेखक आहे. पण त्याला चित्र पाहण्याची संधी त्याचं शहर देत नाही. त्याच्या शहराने कला समन्वयाचा विडा उचलला आणि आर्ट गॅलरी आणि नाट्यगृह एकत्र बांधलं, त्याची भूक शमली, तर त्याचा मेसेज कदाचित असेल, 'तुमच्या चित्रातला आशय कळला. चित्र भावली. प्रदर्शनाला शुभेच्छा!'

जेव्हा माणसाला काही तरी आवडतं, त्या आवडत्या गोष्टीला तो आपल्या घरात स्थानही देऊ शकतो. म्हणजेच, या समन्वयाच्या भूमिकेतून चित्रसाक्षरता आणि चित्रखरेदीही होऊ शकते. एकदा का समाजाला चित्रांची खरेदी करण्याची सवय लागली की, मग ठाणे शहराला, आजुबाजूच्या उपनगराला चित्रकलेची आवड निर्माण होणार आणि मग कलेच्या बाबतीत 'सर्वमंगल मांगल्ये' असे वातावरण तयार होईल.

आपण सारेच ठाणेकर कलादेवतेला, राजमान्य, राजश्री, ईच्छाबळाला साकडं घालूया आणि एकसाथ म्हणूया, व्हय महाराजा! या शहरात एकत्रित कलासमन्वयाची इच्छा पूर्ण होऊ दे! कलारसिक निर्माण होऊ दे! महाराजा, कला विकत घेण्याची इच्छा होऊ दे! व्हय महाराजा! व्हय महाराजा!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरोग्य श‌िस्त गरजेची

$
0
0

>> डॉ. स्म‌िता नरम, वैद्यकीय सल्लागार

डायबेटिसमुळे जडणाऱ्या आजाराची माहिती आपण घेत आहोत. डायबेटिस पूर्ण बरा करणारे कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. पण, जीवनशैलीत काहीसे बदल आणि आहारावर नियंत्रण ठेवले, तर प्रत्येक पेशंटला रक्तातील साखरेचे प्रमाण मर्यादेत ठेवणे शक्य आहे. त्यामुळे आहाराव‌षियी आपण थोडक्यात माह‌तिी घेण्याचा प्रयत्न करू या.

शरीरात व‌षिारी पदार्थ तयार होऊ नयेत, म्हणून आहार खूप महत्त्वाचा आहे. योग्य आहारामुळे पचनाच्या प्रक्रियेला ताब्यात ठेवता येते. त्यामुळे आहाराचे सूत्र पुढीलप्रमाणे ठेवल्यास फायदा होईल. आहारात ६० टक्के भाज्या, ३० टक्के प्रथ‌निे व १० टक्के कार्बोदके, असे असावे त्यामुळे वजनही नियंत्रणात राहाते. डायबेटिस पेशंट अॅलोपथी औषधांच्या जोडीला घरगुती उपायही योजतात. त्यात काही घरगुती उपायही करण्यास हरकत नाही. अर्धा ग्लास पाण्यात हळद पूड अर्धा चमचा, आवळा पूड एक चमचा, मेथी पूड अर्धा चमचा टाकून उपाशी पोटी घ्या.

काय अध‌कि खावे : डायबेटिस पेशंटनी चणे, मूग, मूगडाळ, सोयाबीनची उत्पादने, चणाडाळ, मासे आणि च‌किन आदी प्रथ‌निे पुरवणारे खाद्यपदार्थ, पालक, ह‌रिव्या पालेभाज्या, दुधी, दोडका, भोपळा, पडवळ, कारले, नाचणी, कणीस, जव, ब्रोकोलाय, ब्रुसेल्सचे मोड, गाजर, कोबी, मोहरी, कांदा, लाल व ह‌रिवी म‌रिची, सफरचंद, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी, डाळींब, पपईचा आहार फायदेशीर आहे.

हे टाळा : भात, बटाटा, खरपूस तळलेले अन्न पदार्थ, रेटमीट, साबुदाणा, पास्ता, डबाबंद ज्यूस, हवाबंद पदार्थ, शेंगदाणे

जीवनशैली : दररोज क‌मिान अर्धा तास चालणे, आठवड्यातून तीन तास धावणे व स्विम‌िंग महत्त्वाचे आहे. योगासानांचाही खूप फायदा होतो. केवळ औषधे घेऊन डायबेटिस बरा होत नाही. व्यायामाबरोबर योगासनांचाही फायदा होतो. प्राणायाम, अनुलोम, कपालभाती यांचा दररोज दहा ते वीस म‌नि‌टिे सराव फायदेशीर होतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकजण व्यायामाला वेळ नाही, अशी कारणे देतात. पण, योग्य आहार व व्यायामाला पर्याय नाही. डायबेटिसला दूर ठेवायचे असल्यास स्वतःला श‌स्ति लावून घेणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एका ‘शोध’यात्रेची समाप्ती

$
0
0

मुरलीधर खैरनार हे नाव महाराष्ट्रामधील सांस्कृतिक वर्तुळाला अपरिचित नाही. दिग्दर्शनातील हुकमी एक्का, व्यासंगी व्याख्याता, व्यावसायिक नाटकाच्या मार्केटिंगची गणिते जुळविणारा व्यवस्थापक, वेळप्रसंगी जेथे जो कमी पडेल ती भूमिका साकारणारा हरहुन्नरी कलाकार असे एक ना अनेक चेहरे धारण करणारे हे चतुरस्र व्यक्तिमत्त्व रविवारी काळाच्या पडद्याआड गेले. मुरलीधर खैरनार हे नाव केवळ 'शोध' या कादंबरीमुळे पुढे आलेले नाही तर त्याआधीही या ना त्या कारणाने खैरनार प्रसिद्धीच्या झोतात होतेच. वि. वा. शिरवाडकरांच्या 'वैष्णव' कादंबरीवर नाशिकमधून पहिली मालिका काढणे असो की नाट्यसंमेलनासाठी फैय्याज यांच्या विरोधात अध्यक्षपदासाठी अर्ज भरणे असो मुरलीधर खैरनार नेहेमीच चर्चेत राहिले. अगदी 'अश्वमेध थिएटर्स'सारख्या संस्थेच्या माध्यमातून अभिनय करणाऱ्या रंगकर्मींना शाबासकी देणे असो क‌ी त्यांच्या 'शोध' या संशोधनपर कादंबरीसाठी येणाऱ्या छोट्या-मोठ्या अडचणी असो, हे सर्व 'फेसबुक'वर शेअर करणे आणि त्यातून समस्यांचा निपटारा करणे ही त्यांची खासियत होती. खैरनारांना विहरण्यासाठी खरे मोकळे आभाळ मिळाले ते दीपक मंडळातील सांस्कृतिक विभागात. त्यातूनच त्यांनी कापूसकोंड्याची गोष्ट, आणखी एक नारायण निकम यासारखी नाटके दिग्दर्शित केली. नाशिकमधून अनेक तरूणांना त्यांनी व्यावसायिक नाटकात काम करण्याची संधी दिली. त्यातून अनेकजण पुढे अभिनेते, अभिनेत्री झाले. व्यावसायिक नाटकाची गणिते त्यांना चांगली अवगत होती. काही काळ त्यांनी नाशिक, पुणे आणि मुंबईत, गांवकरी, देशदूत आणि तरुण भारत या दैनिकांतून पत्रकारिता केली. पन्नासहून अधिक एकांकिका, नाटकांचे दिग्दर्शन, अभिनय, चार व्यावसायिक नाटकांची निर्मिती, नाट्य परिषदेच्या विविध पदांवर काम असा त्यांचा आलेख वाढता होता. कॅन्सरने ग्रस्त असलेल्या खैरनार यांनी शेवटपर्यंत आपले मनोधैर्य खचू दिले नाही. केमोथेरपी झाल्यानंतर त्यांच्यामध्ये पूर्वीचाच उत्साह संचारत असे. मात्र, त्यानंतर पक्षाघात झाला. नंतर मेंदूत रक्तस्त्राव झाला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. मराठी साहित्यात संशोधन करून लिहिणारे अनेक लेखक आहेत. मात्र, कित्येक वर्षे किल्ले पालथे घालून, ऐतिहासिक दस्तावेज तपासत त्यावर कादंबरी लिहिणारा आणि चारच महिन्यांत कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीकडे वाटचाल करणारा हा आगळा लेखक मराठी साहित्याने गमावला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐतिहासिक भागीदारी

$
0
0

टाटा या अग्रगण्य उद्योगसमूहाची मालकी असलेला टाटा सन्स ट्रस्ट आणि विज्ञान आणि गणित शिक्षणात क्रांती घडवून आणणाऱ्या खान अकादमी यांच्यात पाच वर्षांसाठी निर्माण झालेली भागीदारी म्हणजे खऱ्या अर्थाने डिजिटल इंडियाच्या दिशेने पडलेले भरीव पाऊल आहे. टाटा सन्स ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांनी ही घोषणा करताना दर्जेदार शिक्षण मोफत उपलब्ध करण्याची कटिबद्धता हेच या नव्या युगाचे वैशिष्ट्य असल्याचे नमूद केले आणि याद्वारे देशातील साक्षरांची संख्या वाढवण्यासाठी हाती आलेली ही जणू सुवर्णसंधीच असल्याचा आशादायी सूर लावला. टाटा ट्रस्ट शतकभरापासून शिक्षणक्षेत्राशी निगडित असून शिष्यवृत्तीपासून अनुदानापर्यंत आणि परदेशी शिक्षणासाठी मदत करण्यापर्यंत अनेक पद्धतीने मदत करीत आहे. म्हणून त्यांनी उचललेले पाऊल टाटांच्या पायाभूत मूल्यांशी सुसंगत आहे. अवघ्या आठ-नऊ वर्षांपूर्वी सलमान खान यांनी चुलत बहिणीला विज्ञान, गणित शिकवण्यासाठी सुरू केलेले व्हिडिओ सर्वांना उपयुक्त ठरू लागले. अवघ्या काही महिन्यांत ती एक जागतिक सेवा बनली. कोणत्याही जाहिरातीचा अंतर्भाव नसलेली ही मोफत सेवा आज जगभर पसरली आहे. खान अकादमीचे संकेतस्थळ २३ भाषांत तर त्यांचे व्हिडिओ हिंदीसह तब्बल ६५ भाषांत उपलब्ध आहेत. रतन टाटा यांनी निवृत्तीनंतर व्यक्तिगत पातळीवर स्वीकारलेला मार्ग पाहता हा करार आश्चर्यकारक नाही. तो सर्वस्वी नव्या युगाशी जोडणारा आहे. आतापर्यंत ज्या कंपन्या आणि उपक्रमांशी ते जोडले गेले किंवा त्यांनी गुंतवणूक केली, ती सर्व डिजिटल आहेत. त्यामुळे खान अकादमीशी त्यांची ट्रस्टच्या माध्यमातून झालेली भागीदारी त्याच दिशेला नेणारी आहे. भारत आधी कम्प्युटर आणि नंतर 'इंटरनेट'मार्गे जगभर दबदबा निर्माण करत असताना देशात नवीन आणि खोल डिजिटल दरी निर्माण झाली. ती भरून काढण्याची दिशा खान अकादमीने दाखवली आहे आणि ही भागीदारी त्यात मोलाचा वाटा उचलेल. गणित व विज्ञान हे माणसाचे आधुनिक ज्ञानचक्षू आहेत, हे गेल्या पाचशे वर्षांतील प्रगतीतून सिद्ध होते. भारताचे या दोन्ही ज्ञानशाखांशी असलेले नाते नव्याने सांगण्याची गरज नाही. गरज आहे ती या नव्या युगात नव्या दृष्टीने आणि क्षमतांनी त्याचा विस्तार करण्याची आणि त्यात भर घालण्याची.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतीयांमध्ये थायरॉइड वाढतोय

$
0
0

> डॉ. ए. वेलुमणी, थायरॉइडतज्ज्ञ

जागरुकतेचा अभाव आणि स्पष्ट लक्षणांची अनुपस्थिती यामुळे भारतीयांमध्ये थायरॉइडचे प्रमाण वाढत आहे. थायरॉइडच्या विकाराची अनेकांना जाणीवच होत नाही. कारण हा विकार प्रामुख्याने स्त्रियांनाच होतो, असा समज आहे. पण, त्याची लक्षणे संभ्रमात टाकणारी आहेत. ३० ते ४५ वयोगटातील पुरुषांना थायरॉइडचा विकार जडण्याची अधिक शक्यता मानली जाते. यामुळे भविष्यात हृदयविषयक समस्या व वंध्यत्वांची समस्याही उद्भवू शकते. त्यामुळे या विकाराची माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करू या.

थायरॉइड ही एक लहान फुलपाखराच्या आकाराची अंतःस्रावी ग्रंथी आहे. ही ग्रंथी मानेच्यामध्ये कंठाच्या खालच्या बाजूला असते. केवळ १५ ते २५ ग्रॅम वजनाच्या ही ग्रंथीमध्ये मानवी शरीराच्या संपूर्ण चयापचयाचे नियंत्रण करण्याची शक्ती असते. थायरॉइडचा विकार कोणत्याही वेळेस होऊ शकतो. कारण त्यामागे नेमके कोणते जनुकीय घटक किंवा जीवनशैलीच्या सवयी कारणीभूत असतात, हे माहीत नसल्याने त्यातील गुंतागुत वाढते.

थायरॉइड व टी हार्मोन्स

ही लहानशी ग्रंथी प्रामुख्याने आपल्या आहारातील आयोडीनचा वापर करून टी ३ (ट्रायआयोडोथायरोनाइन) व टी ४ (थायरोक्सीन) या दोन हार्मोन्सचे नियंत्रण करते. चयापचय प्रक्रियांमधील आंतरसमन्वयात संतुलन राखण्यासाठी या दोन्ही हार्मोन्सची पातळी अतिशय महत्त्वाची असते.

चाचणी कोणी करून घ्यावी?

२५ वर्षांहून अधिक वयाच्या महिला, नुकत्याच प्रसूत झालेल्या महिला, उच्च कोलेस्टेरॉल असलेल्या व्यक्ती, ज्यांचे वजन वेगाने कमी होते किंवा वाढते, ज्यांना थकवा व गळून गेल्यासारखे वाटते, मासिक पाळीच्या चक्रात अडथळा, वंध्यत्व असलेल्या व्यक्ती, या आजाराची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना थायरॉइडचा विकार होण्याची शक्यता अधिक असते.

त्यामुळे अशा व्यक्तींनी खूप सावध राहण्याची गरज आहे. वजन कमी होणे, श्वास लागणे, केस गळती चिडचिड अशी काही लक्षणे आढळल्यास वैद्यकीय सल्ला घ्या. थायरॉइड ग्रंथींमध्ये गाठी किंवा दाह आहे का हे तपासण्यासाठी चाचण्या आहेत. फ्री टी ३, फ्री टी ४, थायरोग्लोब्युलिन, अँटी थायरोग्लोब्युलिन अँटीबॉडी अशा काही वेगवेगळ्या चाचण्या आहेत. थायरॉइड गाठींचे प्रकार निश्चित करण्यासाठी एफएनएसी (फाइन नीडल अॅस्पिरेशन सायटोलॉजी) चाचणी किंवा अल्ट्रासाऊंड चाचण्यांचीही शिफारसही केली जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पायाची जखम हिमनगासारखी

$
0
0

डायबेटिसची राजधानी म्हणून सध्या भारताची ओळख निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत देशात सुमारे साडेतीन कोटी लोकांना डायबेटिस आहे आणि २०३०पर्यंत भारतात आठ कोटींहून अधिक लोकांना डायबेटिस जडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आजारात डायबेटिस पेशंटनी खास करून पायांची कशी काळजी घ्यावी याची माहिती या लेखाच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करू या.

.....

डायबेटिसमध्ये पायाला एखादी लहानशी जखम झाली आहे, असे वाटते पण, ती प्रत्यक्षात हिमनगासारखी असते. जखमेचा थोडा भाग डोळ्यांना दिसतो. पण बराच भाग आतमध्ये खोलवर पसरलेला असतो. त्यामुळे ऑपरेशनच्या आधी जखम लहान दिसते. पण, कित्येकदा वारंवार ऑपरेशन करून खराब झालेले स्नायू, व पायातील पू काढावा लागतो. यासाठी बराच काळ हॉस्पिटलमध्ये राहावे लागते. योग्य उपचार व बरेच प्रयत्न करूनही काही वेळा रोग आटोक्यात आणण्यासाठी व पेशंटचा जीव वाचवण्यासाठी पाय एका विशिष्ट ठिकाणी कापावा लागतो. त्यातच मूत्रपिंड निकामी झाले असेल किंवा दुसरा काही आजार असल्यास जखम बरी होण्यास आणखी वेळ लागतो. त्यामुळे हॉस्पिटलध्ये दाखल करताना पुढील किती दिवस त्या ठिकाणी मुक्काम करावा लागेल हे सांगणे कठीण असते. त्यामुळे उपचार यशस्वी होण्यासाठी पेशंटचे सहकार्यही महत्त्वाचे असते.

जगभरात १९ कोटींहून अधिक डायबेटिस पेशंट आहेत. त्यातील अनेक पेशंटांच्या पायातील संवेदना कमी झाल्याने पायाला झालेल्या जखमा व त्यातील जंतूचा प्रादूर्भाव लक्षात येत नाही. त्यावर वेळीच उपचार न केल्यास जंतूसंसर्ग वाढून गँगरीन होऊ शकते. पुढे पायाची बोटे किंवा पायही कापावा लागतो. एका अंदाजानुसार भारतात दरवर्षी ४० हजारांहून अधिक पेशंटांच्या पाय कापण्याच्या शस्त्रक्रिया होतात. त्यापैकी बहुतांश डायबेटिस पेशंट असतात. भारतासारख्या विकसनशील देशात अनवाणी चालणे अथवा चुकीची पादत्राणे घालणे ही दोन प्रमुख कारणे पायाला जखमा होण्यामागील आहेत. त्यामुळे डायबेटिस पेशंटांनी पायाची खूप काळजी घेणे महत्त्वाचे आहे. या पेशंटनी कोणती काळजी घ्यावी याची माहिती लेखाच्या पुढील भागात घेण्याचा प्रयत्न करू या.

- डॉ. संजय वैद्य,

डायबेटिक फूट सर्जन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 2741 articles
Browse latest View live




Latest Images