Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2741

पाठीची दुखणी…

$
0
0

डॉ. आलोक शर्मा

हल्लीची बैठी जीवनशैली, ऑफीसमध्ये दिवसभर खुर्चीवर बसून काम करण्याची सवय, वाहनाचा अपघात, खेळांमधील जखमा, औद्योगिक अपघात अशा असंख्य कारणांमुळे पाठीच्या मणक्याला इजा होऊ शकते. मणका दुखावण्यास छोटासा धक्काही कारणीभूत ठरू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अलिकडच्या अहवालात जगभरात दरवर्षी अडीच ते पाच लाख लोकांच्या पाठीच्या कण्याला मार लागतो, असे म्हटले आहे. मणक्याला गंभीर स्वरूपाची इजा झाल्यास ती जीवघेणी ठरू शकते. त्यामुळे गरीब व मध्यम अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये अशा व्यक्तींच्या वाचण्याची शक्यता धूसर असते. भारताचाही अशा देशांमध्ये समावेश होतो.

केवळ मार लागल्यामुळे पाठीच्या कण्याला इजा होऊ शकते असे नाही तर आर्थ्रराईटिस ‌किंवा वृद्धत्वामुळेही पाठीच्या मणक्याला इजा होऊ शकते. वजन खेचल्यामुळे किंवा गर्दीत चेंगरल्यानेही मणक्याला धक्का पोहोचू शकतो. मणक्यात सूज येणे क‌िंवा पाणी साचणे यामुळेही पाठीच्या कण्याला इजा पोहोचते.

पाठीच्या मणक्याला इजा (स्पायनल कॉर्ड इंज्युरी-एससीआय) म्हणजे एखाद्या अपघातामुळे मज्जारज्जूला होणारी इजा. पाठीचा कणा हा मेंदूसह शरीराच्या हालचालींना नियंत्रित करतो. कण्याला इजा पोहोचल्याने दैनंदिन जीवनात अडथळे येऊन त्या व्यक्तीच्या कार्यक्षमतेतही फरक पडतो.

तरुण वयात पाठीची दुखणी का मागे लागतात याची माहिती आपण पुढील लेखात घेऊया.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2741

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>