चक्कर येण्याचे कारण साधे असते, मात्र काही वेळा ही व्याधी त्रासदायकही ठरू शकते. चक्कर, घेरी या एकाच प्रकारातील व्याधी आहेत. बाहेरच्या वस्तू स्वतःभोवती फिरत आहेत असे वाटत राहते. अशी भावना अनेक आजारांमध्ये आढळते. काही वेळा उन्हात चालताना घेरी येते. थकवा आल्यावर, उपवास केल्यानंतर शरिरातील साखर कमी होत असल्याने चक्कर येते.
अन्य लक्षणे
> ओकारी येणे, फिके पडणे, घामाघूम होणे, डोके जड होणे, मानसिक दाब.
> धाडकन खाली पडणार अशी भावना
> डोळ्यांसमोर काजवे चमकतात, समोरचे दृश्य धुसर दिसू लागते.
> हात-पाय गळून गेल्यासारखे वाटतात.
> फिकेपणा, घाम येणे, शरीर थंडगार पडणे
> नाडीचे ठोके वाढतात.
> रक्तदाब वाढतो किंवा कमी होतो.
> उलटी, चक्कर, हगवणीचा एकत्रित त्रास होतो.
> कानात आवाज येतात किंवा कमी ऐकू येते.
कारणे
> मानसिक
> मेंदूचे आजार
> उंचावरून खाली पाहणे, चालत्या गाडीमधून बाहेर बघणे.
> मेंदूच्या भागातील आजार
> कानाचे आजार
> रक्तदाब वाढणे.
> मानेचे विकार
उपाय
> नाक, कान, तपासून घ्या. ऐकायला कमी येत असेल तर त्याची कारणे शोधा आणि डॉक्टरांना भेटा.
> डोळ्यांची तपासणी करून घ्या.
> रक्तदाब तपासून घ्या.
> रक्तातील साखर तपासा.
> आरामशीर झोपून किंवा पडून रहा.
> पडताना पाय थोडे वर व डोके थोडे खाली करून झोपावे.
> कोणत्या वेळी कोणत्या कारणांनी चक्कर येते याकडे लक्ष ठेवा व तसे डॉक्टरांना सांगा.चक्कर येऊन गेल्यावर डॉक्टरी सल्ला घ्यावा व उपचार करून घ्यावा.
- डॉ. रोहन व्ही. सावंत (फिजिशिअन )
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट