Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2741

घामोळ्यांवर उपाय

$
0
0


उन्हाळा सुरू झाला की लहान मुलांना घामोळे येतान. उष्ण दमट हवेमुळे त्वचेतून घाम येण्याचे प्रमाण वाढते, घामाच्या ग्रंथींत मृतपेशी अडकून घाम बाहेर येण्याच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. शरिराच्या बाहेर फेकलेल्या घामाचे बिंदू पुन्हा त्वचेच्या आत गेल्याने त्या ग्रंथींना सूज येऊन घामोळे येतात. मुलांमधील घर्मग्रंथीची वाढ पूर्ण झालेली नसल्याने लहान मुलांमधील घामोळ्याचे प्रमाण मोठ्यांपेक्षा जास्त आढळते.

अशी घ्यावी काळजी

लालसर पुरळ असल्यास खूप खाज येते. काही संसर्गजन्य विषाणूंना अटकाव करणाऱ्या पावडरींचा वापर करून डॉक्टरकडे न जाता दोन ते तीन दिवसांत हे घामोळे बरे करता येतात.

दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ पुरळ तसेच राहिले आणि दुर्लक्ष झाले तर त्वचारोग बळावू शकतो. लहान मुलांमध्ये बऱ्याचदा खूप खाजवून जखम झाल्यास त्यात जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. अशा वेळी मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

घामोळे टाळण्यासठी शारिरिक स्वच्छता राखणे गरजेचे असते.

उष्ण व दमट वातावरणात सैल आणि सुती कपडे वापरावेत, म्हणजे त्वचा कोरडी राहण्यास मदत होते.

भरपूर पाणी प्यावे

"' आणि "क' जीवनसत्त्वयुक्त पदार्थ, फळे, हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश करावा.

खूप गरम पाण्याने आंघोळ करू नये.

जास्त घाम येण्याची प्रवृत्ती असणाऱ्या लोकांनी उन्हाळ्यात दिवसातून दोनदा आंघोळ करावी.

लहान मुलांना स्वच्छ पुसून पावडर लावावी व सैल कपडे घालावेत.

मुलांची नखे कापून स्वच्छ ठेवावीत. त्यामुळे नखांतून होणारा संसर्ग थांबतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2741

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>