उष्म्याची तीव्रता वाढली की शरीरामध्ये आम्लाचे प्रमाण वाढू लागते, याला आपण ढोबळमानाने पित्त वाढणे म्हणतो. त्यामुळे शरीराचे सुरळीत असलेले कार्य विस्कळीत होते, झोपेवर परिणाम होतो, भूक मंदावते. ही आम्लता वाढू नये यासाठी काही प्राथमिक काळजी घेणे गरजेचे आहे.
कारणे काय?
शरीरातील आम्लता वाढणे म्हणजेच जठर व त्याच्या शेजारील आतडे यांच्या मधून स्त्रवणाऱ्या आम्लाचे असंतुलन होणे. जठर नेहमी पचनाच्या प्रक्रियेस आवश्यक तितके आणि तेवढेच आम्ल स्त्रावित असते. हे आम्ल पचन क्रियेत अन्नाचे विभाजन करण्यास मदत करत असते.
उष्मा वाढल्यानंतर अधिक मेद, तिखट, तेलकट पदार्थांच्या सेवनाने पोटात त्रास होतो.
ड्यूऑडेनल अॅसिड वाढल्यास रात्री पोट दुखते तसेच रोज ठराविक वेळ झाल्यानंतर पोटदुखी वाढते. एका बाजूला पोट घट्ट व कडक होते. जेवल्यानंतर दोन ते तीन तासांनी उलटी होते.
गॅस्ट्रीक अॅसिड वाढल्यास अपचन, उलटी, मळमळ, गिळताना त्रास होणे तसेच जेवणानंतर पोट फुगणे, भूक न लागणे, शौचावाटे रक्त जाणे असे प्रकार होतात. कधी उलटीवाटे रक्त पडते.
पेपटीक अॅसिड वाढल्यास जेवणानंतर काही वेळाने पोट दुखणे, पोटातील उष्णता वाढणे ही लक्षणे जाणवतात आणि आम्लतानाशक पदार्थ सेवनाने त्रास कमी जाणवतो.
आम्लता वाढल्याने अपचन आणि छातीत जळजळ होते
पोटात दुखणे, मळमळणे, बद्दकोष्ठता, शौचास पातळ होणे, पोटात मुरडा येणे, मळमळल्यासारखे वाटणे ही लक्षणे जेवल्यानंतर जाणवतात. रात्रीच्या जेवणानंतर झोपल्यावर ही लक्षणे जाणवतात व झोपून उठल्यानंतर त्यातील तीव्रता कमी होते.
प्राथमिक साधे उपाय
फ्रीजमध्ये ठेवून एकदम गार केलेले दूध घ्यावे.
खाण्याच्या वेळा सांभाळल्यास निम्मे आजार कमी होतात. जेवणाच्या वेळा सांभाळणे, अति तेलकट, मसालेसार न खाणे, उठल्याबरोबर थंड पाणी पिणे, भूक लागल्याशिवाय न खाणे, जंक फूडला बायबाय करणे, बाहेरचे खाणे शक्यतो टाळलेलेच बरे. मानसिक ताणतणाव न घेणे.
ज्यावेळेला खाण्याची इच्छा नाही तेव्हा बळेबळे खाऊ नये. पण, अगदी उपाशीपोटी राहू नये. थंड (माठातील पाण्याचे) लिंबू सरबत घ्यावे.
डायबिटीस असेल तर नुसतेच लिंबू पाणी घ्यावे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट